शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
2
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
3
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
4
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
5
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
6
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
7
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
8
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
9
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
10
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
11
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
12
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
13
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
14
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
15
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
16
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
17
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
18
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
19
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
20
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
Daily Top 2Weekly Top 5

म्हणाला, 'ती' बेवफा सनम; अन् तिच्याच अपार्टमेंटहून त्याने स्वतःला झोकून दिले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:03 IST

Amravati : पोलिसाने वाचविले प्राणः 'ती'च्यावर बेवफा होण्याचा आरोप, व्हीसीही केली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ती बेवफा सनम निघाली. तिने ब्रेकअप केले. आता तिच्याच समक्ष मला जीवन संपवायचे आहे, असे तो ओरडून पोलिसांना सांगत होता. त्यावेळी त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला त्याने व्हिडिओ कॉलदेखील केला. तर पोलिस 'तू आधी खाली ये, आपण सर्व काही नीट करू', असा शब्द देत होते. सिव्हिल ड्रेसवरील एक पोलिस कर्मचारी त्याच्याशी संवाद साधत असतानाच त्याने स्वतःला सहा मजली अपार्टमेंटच्या बाल्कनीतून स्वतःला खाली झोकून दिले. मात्र पोलिसाने समयसूचकता दाखवत त्याचे प्राण वाचविले. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील पुंडलिकबाबा नगरातील एका अपार्टमेंटमध्ये हा थरार घडला.

वेदांत (२४) असे तरुणाचे नाव आहे. मोर्शी तालुक्यातील रहिवासी वेदांत हा येथे राहून शिक्षण घेतो. दोन वर्षापूर्वी त्याचे एका तरुणीशीत प्रेमसंबंध निर्माण झाले. अलिकडे तरुणीने त्याच्यासोबत ब्रेकअप केले. तिच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी सोमवारीच त्याच्याविरुद्ध एनसी नोंदविली होती.

दोन तास थरार

गाडगेनगरचे ठाणेदार अतुल वर यांनी वेदांतची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्यास तयार नव्हता. आपण तिला अनेकदा आर्थिक मदत केली. ती आपल्याला खोट्या गुन्ह्यात फसविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप त्याने केला. जवळपास दोन तास त्यात गेले. पोलिसांनी त्याला झेलता यावे, यासाठी खाली जाळी लावली होती.

असे वाचविले प्राण

शहर बीडीडीएसमध्ये कार्यरत अंमलदार कमलेश शिंदे हे त्याच परिसरात राहतात. ते मागील बाजूने त्या टेरेसवर चढले. त्याने स्वतःला खाली झोकून दिले तेव्हा शिंदे यांनी त्याला कमरेच्या बाजूने त्यास पकडले. त्यावेळी तो हवेत झुलत होता. अन्य अंमलदारांनी त्याला पकडले. त्याचे प्राण वाचले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Heartbroken Lover Attempts Suicide from Ex-Girlfriend's Apartment, Saved by Police

Web Summary : Upset over a breakup, a young man attempted suicide from his ex-girlfriend's apartment in Amravati. Police intervened, and an officer heroically saved him from falling after he jumped from the balcony.
टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी