‘नही तो मंगनी तोड दूंगा’ची धमकी देत त्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By प्रदीप भाकरे | Updated: May 3, 2023 16:35 IST2023-05-03T16:35:03+5:302023-05-03T16:35:30+5:30
Amravati News खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. वाच्यता केल्यास तिचा साखरपुडा तोडण्याची धमकी देत तिला पळवून नेण्याचा प्रयत्न देखील झाला.

‘नही तो मंगनी तोड दूंगा’ची धमकी देत त्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
प्रदीप भाकरे
अमरावती: खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. वाच्यता केल्यास तिचा साखरपुडा तोडण्याची धमकी देत तिला पळवून नेण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र मुलीच्या कुटुंबियांच्या सजगतेने अपहरणनाट्य टळले. १ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी अरबाज खान (१९, रा. यास्मिननगर, ह. मु. लालखडी) याच्याविरूध्द बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, पिडीत मुलीच्या आईने दुसरे लग्न केल्याने ती तिचे मामा व मामाच्या परिवारासह राहते. तिचे मामाच तिचे पालन करतात. साधारणत: वर्षभरापुर्वी पिडिताच्या घराशेजारी आरोपी अरबाजखान हा रंगकामाकरीता आला होता. तो पिडिताकडे खिडकीमधून सतत पाहत होता. पिडिताला आरोपीने तिचा मोबाईल नंबर मागितला तेव्हा तिने तिच्या मामेभावाच्या हाती मोबाईल नंबर देखील पाठविला. त्या नंतर आरोपी हा तिला वारंवार फोन करुन तिच्याशी बोलत होता. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते. दरम्यान ८ मे २०२२ रोजी तिच्याच घरी शिरून तिच्याशी शारीरिक संबंध केले. वारंवार पिडीताच्या मामाकडे येऊन सोबत आली नाही तर तुझ्या घरच्यांना मारुन टाकीन व तुझी मंगनी तोडून टाकीन, अशा धमक्या तो देत होता.
ती पळतच होती!
आरोपीच्या धमकीला घाबरुन ती त्याच्यासोबत पळून जाण्यास तयार झाली. १ मे रोजी रात्री आठच्या सुमारास ती आरोपीसह पळून जाण्याच्या तयारीत असतांना ती बाब तिच्या मामाच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तिला हटकले. त्यामुळे ती आरोपीसह पळून जाऊ शकली नाही. तर, तिच्या मामाच्या कुटुंबियांनी याबाबत खोलापुरी गेट पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी आरोपीने आपल्यावर वर्षभरापुर्वी बलात्कार केल्याचे बयान तिने दिले.