'त्या' नराधम पित्याला नागपुरातून अटक, मुलीला बो-यात भरून नदीत टाकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 19:59 IST2018-04-30T19:59:02+5:302018-04-30T19:59:02+5:30

घोराड येथील एका नराधमाने अवघ्या चार वर्षांच्या सावत्र मुलीवर अत्याचार करून तिला बो-यात भरून नदीत टाकले होते.

'He' arrested father from Nagpur and filled the girl | 'त्या' नराधम पित्याला नागपुरातून अटक, मुलीला बो-यात भरून नदीत टाकले 

'त्या' नराधम पित्याला नागपुरातून अटक, मुलीला बो-यात भरून नदीत टाकले 

वरूड (अमरावती) : तालुक्यातील घोराड येथील एका नराधमाने अवघ्या चार वर्षांच्या सावत्र मुलीवर अत्याचार करून तिला बो-यात भरून नदीत टाकले होते. तक्रारीच्या अनुषंगानं पोलीस त्याच्या शोधात सोमवारी वरूड पोलीस नागपूर येथील नराधमाच्या दुस-या पत्नीच्या घरी गेले असता, रेवनाथ धुर्वे तेथे आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.

तालुक्यातील घोराड येथे कामाच्या शोधात आलेले मध्य प्रदेशातील आदिवासी रेवनाथ रामप्रकाश धुर्वे (३६, रा. देवी पडोला ता. सौसर जि. छिंदवाडा  म.पी ) याने दारूच्या नशेत त्याच्या घोराड येथील खोपडीत  शुक्रवारी दुपारी चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केला व मुलीला बो-यात भरून गावालगतच्या नदीत टाकले होते. आरोपी मुलीचा पिता मात्र फरार झाला होता. आरोपी पित्याविरुद्ध कलम ३७६, ३६६, पोस्को (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी रेवनाथ हा सिंधी झुलकी ता. कलमेश्वर जिल्हा नागपूर येथील दुस-या पत्नीच्या घरी आढळून आला. सदर कारवाई एपीआय विजय शिंगाडे, सुजित कांबळे, पीएसआय प्रिया उमाळे, जमादार संतोष ठाकरे यांच्यासह वरूड पोलिसांनी केली.  पुढील तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी, ठाणेदार गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनात वरुड पोलीस करीत आहे.

Web Title: 'He' arrested father from Nagpur and filled the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.