नझूलच्या जागा धोक्यात

By Admin | Updated: June 15, 2014 23:13 IST2014-06-15T23:13:53+5:302014-06-15T23:13:53+5:30

शहरात नझुलच्या मोक्याच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने या जागा धोक्यात आल्या आहेत. काहींनी या जागा ताब्यात घेऊन परस्पर विक्री करण्याचा गोरखधंदादेखील सुरू केला आहे.

Hazardous space danger | नझूलच्या जागा धोक्यात

नझूलच्या जागा धोक्यात

अतिक्रमण : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
अमरावती : शहरात नझुलच्या मोक्याच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने या जागा धोक्यात आल्या आहेत. काहींनी या जागा ताब्यात घेऊन परस्पर विक्री करण्याचा गोरखधंदादेखील सुरू केला आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
शासनाला एखादा प्रकल्प, क्रीडांगण, सांस्कृतिक भवन, कार्यालय, संकुल किंवा सभागृह निर्माण करायचे झाल्यास नझूलच्या जागेवर ते करणे शक्य आहे. एवढेच नव्हे तर नझूलच्या जागेचे संरक्षण आणि करवाढीसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहे.
क्रिम जागा अतिक्रमित
काही वर्षांपासून या जागेवर अतिक्रमण करून त्या गिळंकृत करण्याचा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू असताना हा विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे वास्तव आहे. शहरातील ‘क्रिम’ जागेवर अतिक्रमण होत असताना संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी या बाबतची माहिती प्रशासनाला देण्याचे सौजन्यही दाखवत नाही, असा अफलातून कारभार नझुल विभागाचा सुरू आहे. महानगरात नझूलच्या ७० टक्क्यापेक्षा जास्त जागांवर अतिक्रमण झाले असून त्या रिकाम्या करणे प्रशासनापुढे आव्हान आहे. अतिक्रमण हे कर्मचाऱ्यांच्या संगनमताने होत असून मोक्याच्या जागा याच प्रकारामुळे हातून जात आहे. काहींनी नझूलच्या जागा लिजपट्ट्यावर घेतल्या आहेत; मात्र लिज संपल्यानंतरही या जागा परत घेण्यासंदर्भाची कार्यवाही विभागाकडून होत नसल्याची माहिती आहे. ज्यांच्याकडे लिजच्या जागा आहेत, त्यांनी या जागेवर संकुल उभारून ते भाडेतत्वाने दिले आहेत. दरमहा लाखो रूपये भाड्याच्या स्वरूपात वसुल करण्याचा लिजधारकांनी नवा धंदा शोधला आहे. बडनेऱ्यातील अलमासनगर, रजानगर, पाचबंगला, माताफैल, राहुलनगर, निंभोरा (विटभट्टी) तसेच यशोदानगर, महादेव खोरी, व्यैकय्यापुरा, राहुलनगर, बिच्छूटेकडी, वडाळी, चिलमछावणी, नवसारी, वलगाव रोड, पत्रकार कॉलनी परिसर, अकोली, विलासनगर, नूर नगर, लालखडी, रहाटगाव आदी भागात नझूलच्या जागांवर अतिक्रमण झाले आहे.

Web Title: Hazardous space danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.