हॉकर्स परवाने देण्याचा मार्ग सुकर

By Admin | Updated: August 6, 2014 23:34 IST2014-08-06T23:34:58+5:302014-08-06T23:34:58+5:30

शहरात हॉकर्स व्यावसायिकांना अधिकृत परवाने देण्यासाठी व्यावसायिकांचे सर्वेक्षण आणि हॉकर्स झोन स्थळाची पाहणी करण्याचा निर्णय बुधवारी पार पडलेल्या समितीच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

The Hawker's Way to Get Licenses | हॉकर्स परवाने देण्याचा मार्ग सुकर

हॉकर्स परवाने देण्याचा मार्ग सुकर

समितीची बैठक : झोननिहाय सर्वेक्षणाचा निर्णय
अमरावती : शहरात हॉकर्स व्यावसायिकांना अधिकृत परवाने देण्यासाठी व्यावसायिकांचे सर्वेक्षण आणि हॉकर्स झोन स्थळाची पाहणी करण्याचा निर्णय बुधवारी पार पडलेल्या समितीच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या हॉकर्स व्यावसायिकांना अधिकृत परवाने देण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
महापालिकेत आयुक्त अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली हॉकर्स झोनविषयी बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, महापालिकेचे उपायुक्त विनायक औगड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पूर्व विभाग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय डहाके, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, सहायक संचालक नगर रचना अधिकारी सुरेंद्र कांबळे, सहायक आयुक्त राहुल ओगले, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, गंगाप्रसाद जयस्वाल, सहायक अभियंता दीपक खडेकार, सुनील घटाळे, गणेश कुत्तरमारे, विजय जोशी, श्वेता बारडे, अशोक हरणे, राणी जोशी, माला उके, अब्दुल मजीद, जे.एम. कोठारी, मुकीम अहमद, काशीकर, शेख सादीक बागवान, गणेश मारोडकर आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी हॉकर्स, व्यावसायिक प्रतिनिधिनींच्या सूचना व गाऱ्हाणी ऐकून घेतल्या.

Web Title: The Hawker's Way to Get Licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.