शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अनेक वर्षांपासून सुरू आहे कुंटणखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:14 IST

उच्चभ्रू वस्तीत गणल्या जाणाऱ्या भूमिपुत्र कॉलनीत अनेक वर्षांपासून कुंटणखाना सुरू होता. मात्र, त्याची भनक फे्रजरपुरा पोलिसांना लागली नाही, हा निर्ढावलेपणाचा कळस आहे.

ठळक मुद्देनिर्ढावलेपणाचा कळस : पोलीस अनभिज्ञ, कुणाचाच कसा नाही विरोध ?

वैभव बाबरेकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : उच्चभ्रू वस्तीत गणल्या जाणाऱ्या भूमिपुत्र कॉलनीत अनेक वर्षांपासून कुंटणखाना सुरू होता. मात्र, त्याची भनक फे्रजरपुरा पोलिसांना लागली नाही, हा निर्ढावलेपणाचा कळस आहे. विशेष म्हणजे, प्रतिष्ठांच्या परिसरात हा किळसवाणा प्रकार घडतो आणि त्याला कोणीच विरोध करीत नाही, हेदेखील आश्चर्य आहे.भूमिपुत्र कॉलनीतील नाल्याच्या काठावर असणाºया एका आलीशान घरात मनीष मार्टीन राहतो. ते घर मनीषच्या ७३ वर्षीय आत्याच्या नावावर आहे. दोन हजार चौरस फुटाच्या या घरात मोठा हॉल, एक बेडरूम, किचन व छोटीशी स्टोअर रूम आहे. घर मनीषच्या आत्याच्या नावावर असले तरी मनीषच्या प्रतापांमुळे ती एक-दीड महिन्यांपूर्वी बहिणीकडे राहायला गेली. गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या मनीषला नातलगांसह कॉलनीतील नागरिकही त्रस्त झाली आहेत. मनीषच्या घरात कुंटणखाना चालतो, ही बाब जगजाहीर आहे. दिवसरात्र त्याच्या घरात ग्राहकांच्या येरझारा सुरूच असतात. ग्राहक आपआपल्या प्रेयसी किंवा वेश्याव्यवसायातील महिलांना त्या ठिकाणी आणणात आणि पाचशे रुपये देऊन विसावा घेतात. त्याच्या मोबदल्यात मनीष त्यांना सर्व सुविधा पुरवीत होता. त्याने घराच्या देखभालीसाठी एक केअरटेकरसुद्धा ठेवला आहे.परिसरातील महिला या घरापुढून ये-जा करण्यासही कुचरत होत्या. मात्र, विरोधाची हिंमतच कोणी न दाखविल्याने मनीषचे धाडस वाढले. दोन वर्षांपूर्वी या कुंटणखान्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. मात्र, पोलिसांनी केवळ समज दिला होता. त्यामुळे त्यानंतरही मनीषचे प्रताप स ुरूच राहिले. फक्त आता ग्राहकांना मागील दाराने बोलाविण्याचे सत्र सुरू झाले. मनीष मार्टिनला आता कोतवाली पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अटक केली आहे. त्याने आरोपी आॅटोचालक एहफाज अली हैदर अली (२१, रा. गौसनगर) याला काही तासाच्या रासलीलेकरिता खोली भाड्याने दिली होती.झाडाझुडुपांमध्ये लपले घराचे अस्तित्वमनीष मार्टिनच्या घराचा आवार हा निसर्गरम्य आहे. सभोवताल तारेचे तुटक कम्पाऊंड असून, प्रवेशद्वाराला पोलादी पत्रा आहे. सहजासहजी बाहेरून पाहिल्यास घर दृष्टीस पडत नाही. कारण ते झाडाझुडुपांनी वेढले आहे. निसर्गरम्य वातावरण असणाºया या बंगल्याचा उपयोग कुंटणखान्यासाठी होतो, ही कल्पनाही बाहेरून हा बंगला बघणाºयांना शिवत नाही.मनीष मार्टिनच्या घरात अश्लील प्रकार चालत असल्याचे घरझडतीमध्ये आढळून आले आहे. त्याच्या घरातून गादी जप्त करण्यात आली आहे.- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.मनीषच्या घरातून गादी जप्तअमरावती : मनीष व एहफाजची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. मंगळवारी या दोघांनाही भूमिपुत्र कॉलनीतील घटनास्थळी पोलिसांनी आणले. त्यावेळी घराच्या पुढील दाराला कुलूप लागले होते, तर मागील दार उघडे होते. कोतवालीच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड, डीबीचे अब्दुल कलाम, गजानन ढेवले यांनी मनीषकडून या घराविषयी माहिती जाणून घेतली. पोलिसांनी त्याच्या घरातील प्रत्येक खोली तपासली. या ठिकाणी सिंगल बेडच्या गाद्या आढळून आल्या. या गाद्यांचा लैंगिक चाळ्यासाठी उपयोग होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सरकारी पंच म्हणून महापालिकेचे गिरीश चव्हाण व बळीराम हिवराळे उपस्थित होते. पोलिसांना घराच्या आवारात एमएच २७ एक्स-८५२ क्रमांकाची संशयास्पद दुचाकी आढळून आली. ती मनीषच्या मित्राची असल्याचे सांगण्यात येत आहे.