हरिबालाजी एन. नवे एसपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:59 IST2019-07-15T23:59:03+5:302019-07-15T23:59:46+5:30
भारतीय व राज्य सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पद्दोन्नती बदल्याचे आदेश सोमवारी धडकले. अमरावती ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीतील अपर पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांची नियुक्ती झाली आहे. मावळते पोलीस अधीक्षक दिलीप झळके नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर शहर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त प्रदीप चव्हाण यांची बदली मुंबई पश्चिम रेल्वे येथील पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली.

हरिबालाजी एन. नवे एसपी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय व राज्य सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पद्दोन्नती बदल्याचे आदेश सोमवारी धडकले. अमरावती ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीतील अपर पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांची नियुक्ती झाली आहे. मावळते पोलीस अधीक्षक दिलीप झळके नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर शहर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त प्रदीप चव्हाण यांची बदली मुंबई पश्चिम रेल्वे येथील पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली.
भारतीय व राज्य पोलीस सेवेतील ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त संवर्गातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या विविध ठिकाणी करण्यात आल्या. मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त प्रशांत होळकर यांची अमरावती शहर पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस अधीक्षक निवा जैन यांची बदली पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ समादेशक, जळगावातील अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांची बदली अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ३ मधील समादेशक, तर अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ मधील समादेशक महेश चिमटे हे मुंबईत महाराष्ट्र विधानमंडळ येथील मुख्य सुरक्षा अधिकारी झाले आहेत.