विवाहित महिलेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST2021-02-08T04:13:04+5:302021-02-08T04:13:04+5:30

अमरावती : माहेरून पैसे आणण्याकरिता एका महिलेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना दत्तनगर, कात्रज येथे ३१ डिसेंबर २०१८ ...

Harassment of a married woman | विवाहित महिलेचा छळ

विवाहित महिलेचा छळ

अमरावती : माहेरून पैसे आणण्याकरिता एका महिलेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना दत्तनगर, कात्रज येथे ३१ डिसेंबर २०१८ ते १५ मार्च २०१९ दरम्यान घडली. याप्रकरणी सासरच्या मंडीळीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सुनील अरुण तायडे (रा. विनायक सोसायटी, दत्तनगर, कात्रज, पुणे) सह अन्य तीन जणांवर नांदगावपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-------------------------------

युवकाच्या डोक्यावर सळईने मारहाण

अमरावती : प्लॉटवर खोदकाम का करतो, या कारणावरून वाद करून एका युवकाच्या डोक्यावर सळई मारून जखमी केल्याची घटना नवसारी गावठाण येथे रविवारी घडली. आरोपी मुन्ना भीमसिंह पवार, दीपक पवार (दोन्ही रा. नवासारी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी उमेश अर्जुनसिंह पवार (२७, रा. नवसारी) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.

------------------------------------

इसमाचा मृत्यू

अमरावती : भोवळ येऊन कोसळलेल्या इसमाला येथील इर्विन रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना रविवारी सकाळी घडली. श्यामलाल शिवलालजी सोळंके (४५, रा. नागठाणा गावठाण) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

-------------------------------------

उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री

अमरावती : पंचवटी चौक, राजकमल चौक व जयस्तंभ चौकात हातगाडीवर उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री करण्यात येत असून या ठिकाणी कमी दर्जाच्या अन्न पदार्थाची विक्री करण्यात येत असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व प्रशासन विभागाने व्यावसायिकांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

---------------------------

Web Title: Harassment of a married woman