हनुमान जयंती उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:12 IST2021-04-25T04:12:59+5:302021-04-25T04:12:59+5:30

महारुद्र मारुतींची पूजा-अर्चना करून मनोमन आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.-------------- आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर अमरावती ...

Hanuman Jayanti celebrations canceled | हनुमान जयंती उत्सव रद्द

हनुमान जयंती उत्सव रद्द

महारुद्र मारुतींची पूजा-अर्चना करून मनोमन आशीर्वाद घ्यावेत, असे

आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.--------------

आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर

अमरावती : आझाद हिंद मंडळातर्फे मंडळाचे कार्यकर्ते सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन १ मे रोजी स्व. हरिभाऊ कलोती स्मारक आझाद हिंद मंडळ येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रक्ताची गरज लक्षात घेऊन हे शिबिर होत आहे.

—————-

कोविड कर्तव्यावरील शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच हवे

अमरावती : कोरोना काळात अध्यापनाव्यतिरिक्त प्रशासनाकडून नेमून दिलेल्या आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील कर्तव्य करत असताना ३१ डिसेंबर २०२० नंतर कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लक्ष रुपयांची विमा रक्कम मिळावी, अशी मागणी प्रहारचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Web Title: Hanuman Jayanti celebrations canceled