विनोद शिवकुमार याला फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST2021-03-27T04:14:07+5:302021-03-27T04:14:07+5:30

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला प्रमुख जबाबदार असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला ...

Hang Vinod Shivkumar | विनोद शिवकुमार याला फाशी द्या

विनोद शिवकुमार याला फाशी द्या

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला प्रमुख जबाबदार असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला फाशी द्या, अशी मागणी दीपाली यांच्या आईने आक्रोश व्यक्त करताना मांडली.

जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. हे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात भेट देण्यासाठी आले असता मृत दीपाली यांच्या आईने विनोद शिवकुमार यांच्याच मानसिक त्रासाने आत्महत्या केल्याचा आरोप केला. एकतर शिवकुमारला फाशी द्या, अन्यथा मला फाशी द्या, असा आक्रोश त्यांनी केला. पाच वर्षांपूर्वी दीपाली हिच्या वडिलाचा व धाकट्या भावाचा मृत्यू झाला. आता दीपाली हिने आत्महत्या केली. आता माझी मुलगी परत येणार नाही. मात्र, ज्या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलले त्या अधिकाऱ्याला पोलिसांनी जमानत होऊ देऊ नये, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा मला फाशी द्यावी, असा आक्रोश दीपालीच्या वृद्ध आईने केला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. मोठी मुलगी वैशाली कुलदीप पवार(सातारा) व आत्या सुनंदा चव्हाण (पुणे) यांच्याही आश्रृंचा बांध फुटला.

-----------

Web Title: Hang Vinod Shivkumar