बँकेतील पैसा सांभाळा; केवायसीच्या नावावर होऊ शकते फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST2021-07-22T04:09:29+5:302021-07-22T04:09:29+5:30

पान ३ वर मस्ट ओटीपी शेअर करू नका, अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन अमरावती : शहर व जिल्ह्यात ...

Handle money in the bank; Fraud can occur in the name of KYC | बँकेतील पैसा सांभाळा; केवायसीच्या नावावर होऊ शकते फसवणूक

बँकेतील पैसा सांभाळा; केवायसीच्या नावावर होऊ शकते फसवणूक

पान ३ वर मस्ट

ओटीपी शेअर करू नका, अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन

अमरावती : शहर व जिल्ह्यात अलीकडे ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार बेसुमार वाढले आहेत. अमुक बँकेतून बोलतो. तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड बँक खात्याशी संलग्न नाही. ते संलग्न न केल्यास बँक खाते ‘डेड’ होईल. तुम्हाला एटीएम कार्डदेखील वापरता येणार नाही, अशी बतावणी करून बँक खात्यातून परस्पर रक्कम वळती होण्याचे प्रकार वाढले आहेत. सोबतच क्यूआर कोड स्कॅन करण्याची नवी ट्रिक वापरून ऑनलाईन फसवणुकीचा गोरखधंदा अगदी तेजीत आला आहे. त्यामुळे केवायसी वा अन्य कुठल्या ऑनलाईन खरेदीसाठी कुणी लिंक पाठविल्यास मोहात पडून नका. लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या बँक खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. अलीकडे या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्मार्ट मोबाईलधारकांनी कमालीची सावधानी बाळगण्याची गरज आहे.

प्रकरण १

ओएलएक्सवर वस्तू विक्रीकरिता जाहिरात पाहिली. ती वस्तू खरेदी करण्यासाठी व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने व्हॉट्सॲप मेसेजद्वारे क्यूआर कोड पाठवून स्कॅन करावयास सांगितले गेले. तो स्कॅन केल्याबरोबर बँक खात्यातून रक्कम डेबिट झाली. रक्कम कपात झाल्याचा मेसेजच झळकला.

प्रकरण २

मोबाईल वॅलेट कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून केवायसी अपडेट करावयाची आहे, असे सांगून त्याकरिता क्यूआर कोड स्कॅन करावयास सांगण्यात आले. एका अकाऊंटवर पेमेंट करण्याची सूचना आली. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर खात्यातून रक्कम कपात झाली.

प्रकरण ३

एका बड्या बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून केवायसीसाठी लिंक पाठविण्यात आली. लिंकवर क्लिक केले. त्यापुढे आणखी एक वेबसाईट उघडली गेली. त्यात बँकेचा खातेक्रमांक दर्शविण्यात आला. ती माहिती भरली असता बँक खात्यातून मोठी रक्कम परस्पर विड्रॉल झाली.

गेलेला पैसा परत मिळणे कठीण

फायनान्शियल फ्रॉडचे कनेक्शन अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर असते. नायजेरियन फ्रॉडही त्यातील एक. सायबर गुन्हेगार लगेचच तो पैसा अन्यत्र तातडीने वळवितात. त्यामुळे गेलेला पैसा परत मिळविण्याची कुठलीही शाश्वती नाही. जानेवारी ते मेपर्यंत ऑनलाईन फसवणुकीचे १० गुन्हे नोंदविण्यात आले.

कोट

केवायसीसाठी मोबाईलवर लिंक आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. ॲप डाऊनलोड करतेवेळी सावधगिरी बाळगा. अनोळखी ॲपवर वा लिंकवर क्लिक करू नका. ऑनलाईन पेमेंटबाबत सजग राहा. फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

- सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

Web Title: Handle money in the bank; Fraud can occur in the name of KYC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.