राजकमल, जयस्तंभ चौकात अर्धा तास वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST2021-07-07T04:14:23+5:302021-07-07T04:14:23+5:30
अमरावती : दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा, त्यात अर्धा तासपावेतो ट्राफिक जॅमचा फटका अमरावतीकरांना दुपारी दीडचे दरम्यान बसला. यात अनेक ...

राजकमल, जयस्तंभ चौकात अर्धा तास वाहतूककोंडी
अमरावती : दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा, त्यात अर्धा तासपावेतो ट्राफिक जॅमचा फटका अमरावतीकरांना दुपारी दीडचे दरम्यान बसला. यात अनेक महिला लहान मुलांना घेऊन दुचाकीवर होत्या, तर काही वृद्ध, काही रुग्ण या वाहतूककोंडीत अडकून होते. राजकमल चौकात जॅम लागल्याने जयस्तंभ व गांधी चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक नागरिकांनी मधला पर्याय शोधल्याने सरोज चौक, कॉटन मार्केट रोड आदी चौकातदेखील वाहतुकीची कोंडी झाली. राजकमल ते गांधी चौक, राजकमल ते राजापेठ, राजकमल ते जयस्तंभ, जयस्तंभ ते बापट चौक यादरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
-------------
पोलीस आयुक्तांना निवेदन
कोरोनाकाळात अशी गर्दी होणे धोक्याचे आहे. राजापेठ येथील बस स्टँड सुरू झाल्याने या ठिकाणची अवैध पार्किंग व त्यामुळे रोज होणारी वाहतूककोंडी याबाबत गंभीरतेने लक्ष घालून वाहतूक सुरळीत होण्याकरिता कार्यवाही करण्याचे निवेदन भाजपचे सभागृहनेता तुषार भारतीय यांनी पोलीस आयुक्तांना सोमवारी दिले.