शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

अर्ध्या शतकापासून ‘ते’ रेडिओला म्हणतात, ‘तू माझा सांगाती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:30 IST

येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात.

ठळक मुद्देतंदुरूस्त अण्णा : वयाच्या ९३ व्या वर्षीही रोज वाचतात चष्म्याविना 'लोकमत'

देवेंद्र धोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा(शहीद) : येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात.वर्तमानपत्रानंतर भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले. बी.बी.सी.च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्रॉडकास्टिंग कापोर्रेशनच्यावतीने पहिल्यांदा मुंबई आकाशवाणीची सुरुवात केली. मात्र, १९२४ साली मद्रास येथून एका खासगी संस्थेने प्रसारणास सुरुवात केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली. कामगार व उद्योग या विभागांतर्गत 'भारतीय राज्य प्रसारण मंडळ' नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे 'आॅल इंडिया रेडिओ' असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा 'आॅल इंडिया रेडिओ' नावाचा स्वतंत्र विभाग माहिती, प्रसारण मंत्रालयांतर्गत स्थापन केला. त्याचे अधिकृतरीत्या 'आकाशवाणी' हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. वर्तमानपत्रानंतर आलेला रेडिओ प्रसार माध्यमाचा जगातील क्रांतिकारी आविष्कार होता.अण्णा म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या गोपाळरावांनी ४७ वर्षांआधी जेव्हा रेडिओ खरेदी केला, तेव्हा लोकांत कुतूहल होती. नुसता हा बोलता पोपट पाहण्यासाठी अनेक लोकं त्यांच्याकडे यायचे. बातम्या व मनोरंजनाचे कार्यक्रम ऐकण्यासाठी रोजच्या गर्दीचे अनेक किस्से अण्णा सांगतात. राष्ट्रीय घडामोडी, देशाच्या निवडणुकांचे निकाल, पाकिस्तानशी युद्वाविषयीच्या बातम्या जेव्हा प्रसारित व्हायच्या, तेव्हा तर ऐकणाºयांची संख्या शेकडोच्या घरात असायची, असे अण्णा सांगतात. इंदिरा गांधींच्या हत्तेची बातमी ऐकायला सतत आठ-दहा दिवस लोकं जमायची, इतकेच नाही तर वार्तांकन सुरू असताना अनेक जणांना अश्रू अनावर व्हायचे, असे कित्येक किस्से अण्णांकडे आहेत.रेडिओशी नाळ कायमटेलीव्हिजनच्या शोधाने रेडिओ मागे पडला. आज इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया सर्वाधिक लोकांची पसंती असल्याने रेडिओ कालबाह्य झाले असताना वयाच्या ९३ व्या वर्षीही त्यांना वाचन करण्यासाठी चष्म्याची गरज भासत नाही, हे विशेष. घरी सर्वच साधने असली तरीही गोपाळरावांनी मात्र रेडिओशी आपली नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे अण्णा आपल्या जुन्या मित्राला बेइमान झालेले नाहीत.