बाल हास्याची रंगली मैफल

By Admin | Updated: July 28, 2015 00:41 IST2015-07-28T00:41:24+5:302015-07-28T00:41:24+5:30

चिमुकल्यांचा गोंगाट, आयांची धावपळ, काही हौशी पालकांची पाल्यासह फोटो काढण्यासाठी सुरू असलेली कसरत,

Hairdresser | बाल हास्याची रंगली मैफल

बाल हास्याची रंगली मैफल

सुदृढ बालक स्पर्धा : ‘जॉन्सन’च्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ३५० बालकांचा समावेश
अमरावती : चिमुकल्यांचा गोंगाट, आयांची धावपळ, काही हौशी पालकांची पाल्यासह फोटो काढण्यासाठी सुरू असलेली कसरत, चिमुकल्यांचे निरागस आणि अवखळ हास्य अशा विविध आनंददायी क्षणांमुळे स्वर्गातील नंदनवनाचा भास निर्माण झाला. निमित्त होते ‘जॉन्सन बेबी’ प्रायोजित ‘लोकमत’ सुदृढ बालक स्पर्धेचे.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात शुक्रवारी ही स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन ‘प्रयास’चे संचालक अविनाश सावजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालरोग तज्ज्ञांची संघटना आयएपीचे अध्यक्ष हृषीकेश नागलकर, सचिव नीलेश पंचबुध्दे, कोषाध्यक्ष नरेश तायडे, सतीश अग्रवाल, जयंत पांढरीकर, सोनाली शिरभाते, ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गणेश देशमुख तसेच जॉन्सन अँड जॉन्सनचे अनिल सांगवान, स्नेहलकुमार वेद उपस्थित होते.
ही स्पर्धा तीन वयोगटांत पार पडली. त्यात पहिला गट ० ते १, दुसरा गट १ ते ३ आणि तिसरा गट ३ ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांचा होता. स्पर्धेत ३५० हून अधिक बालकांनी सहभाग घेतला. सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत झालेल्या या स्पर्धेत माता-पित्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रमात जॉन्सन अँड जॉन्सनचे सुनील सांगवान, स्नेहलकुमार वेद यांनी जॉन्सनतर्फे बाळाची निगा याविषयी मार्गदर्शन केले. बाळाच्या आरोग्याला साजेशी अशी शुध्द, सौम्य, संवेदनशील आणि वैद्यकीय परीक्षणातून सिध्द झालेली उत्पादने निर्माण करण्याची उज्ज्वल परंपवरा जॉन्सन बेबीला लाभलेली आहे. कंपनीची सर्व उत्पादने गुणवत्तेच्या आधारावर कुठलीही तडजोड न करता कठोर वैद्यकीय चाचण्यांमधून मंजूर केली जातात. म्हणून १०० वर्षांपासून लहान मुलांची काळजी घेण्याबाबत एक विश्वासू नाव म्हणून जॉन्सन बेबीची ओळख आहे. सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अश तिहेरी लाभयुक्त जॉन्सन बेबी ट्रिपल बेबी प्रोटेक्सन उत्पादनाद्वारे ग्राहकांना नेहमी दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण सेवा पुरविण्यासाठी कंपनी नेहमी तत्पर राहिली आहे.
यावेळी डॉक्टरांनी उपस्थित मातांना शिशुंच्या आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. लहान मुलांची त्वचा ही प्रौढ व्यक्तिच्या त्वचेपेक्षा खूप वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी खास पध्दतीने तयार केलेली सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशीच उत्पादने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
स्पर्धेच्या स्थळी पालकांसह चिमुकल्यांची ऐन वेळेपर्यंत नोंदणी सुरू होती. पालकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. वयोगटानुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुलांची शारीरिक तपासणी केल्यानंतर त्यांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला. कार्यक्रमात सहभागी बालरोगतज्ज्ञ जयंत पांढरीकर आणि सतीश अग्रवाल यांनी पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिलीत. तसेच शंकांचे निरसनही केले.
अशा प्रकारचे कार्यक्रम पालक आणि मुले दोघांसाठीही फायदेशीर सिध्द होत असल्याने या कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जावे, अशा प्रतिक्रिया उपस्थित पालकवर्गाने दिल्यात.
शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कार्यक्रमात सहभागी चिमुकले आणि पालकांची संख्या रोडावते की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, भर पावसातही स्पर्धकांसह त्यांच्या माता-पित्यांच्या उत्साहात तसुभरही कमतरता जाणवली नाही, हे विशेष.

ताठ मानेने जगणारी, सदा हसणारी मुले घडवा : डॉ. सावजी
तुमची मुले शंभर वर्षे जगावीत असे तुम्हाला वाटत असेल तर चार बाबींचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. अविनाश सावजी यांनी स्पष्ट केले. ताजा व स्वच्छ आहार, घाम गळेल इतपत शारीरिक श्रम, प्रेमपूर्ण आयुष्य आणि जगण्यासाठी हेतू या चार तत्त्वांचा आयुष्यात अवलंब केल्यास शंभरी पार केली जाऊ शकते, असे संशोधन वैद्यकीय शास्त्राने केल्याचे ते म्हणाले. पांढऱ्या साखरेऐवजी गुळाचा वापर आणि रिफाइंड तेलाऐवजी घाणीच्या तेलाचा वापर आयुरारोग्य वाढविण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. विज्ञान तुम्हा आम्हास सर्वांनाच ठाऊक असते. परंतु त्याचा वापर केवळ स्पर्धा परीक्षेपूरताच केला जातो. स्वत:च्या आयुष्यातही ज्ञात विज्ञानाचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले. शहाण्या माणसांची स्वप्ने दाखविण्याऐवजी वेडेपणाची स्वप्ने मुलांना दाखवा. ताठमाणेने जगणे आणि कुठल्याही स्थितीत चेहऱ्यावर हास्य जपणे या दोन बाबी मुलांना शिकवायलाच हव्यात. प्रत्येक मुलगा एकमेवाद्वितीय असतो. त्याची इतरांशी स्पर्धा असूच शकत नाही. असेलच तर ती स्वत:शीच असते. मुलांमधील आवडी-निवडी शोधण्यासाठी त्यांना मदत करा. गाडी, बंगला, गलेलठ्ठ पगाराची नोकरी यासाठीचे दिशादर्शन केले जात असतानाच रस्त्यावर संसार थाटून जगणाऱ्या गरिबांच्या आयुषांची मुलांना जवळून ओळख करून द्या. त्यासाठी मुद्दामच प्रवास करा. जिंकण्यासाठीचा मार्ग अशाच माणुसकीच्या नात्यातून जातो, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

Web Title: Hairdresser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.