लेहेगाव परिसराला गारपिटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:10+5:30
अवकाळी व वादळी गारपिटीसह बुधवारी पहाटे आलेल्या पावसाने लेहेगाव परिसरातील काटपूर, वाघोली, धामणगाव, सावरखेड पिंगळाई, शिरखेड, निंभी, नेरपिंगळाई आदी गावांना मोठा फटका बसला असून कपाशी, तूर, हरभरा, गहू बागायती पिके विशेष म्हणजे संत्रा मृगबहाराचा संत्रा गारपिटीत सापडल्याने शेतकºयांच्या हाताशी आलेले संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखो रूपयाचा संत्रा जमिनीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लेहेगाव परिसराला गारपिटीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
लेहेगाव/नेरपिंगळाई : लेहेगाव परिसरात गारपिटीसह वादळी पावसाने सुरूवात केली असून आवळ्याएवढी गार पडल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले असून शासनाने त्वरीत प्रत्यक्ष पाहणी करून शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
अवकाळी व वादळी गारपिटीसह बुधवारी पहाटे आलेल्या पावसाने लेहेगाव परिसरातील काटपूर, वाघोली, धामणगाव, सावरखेड पिंगळाई, शिरखेड, निंभी, नेरपिंगळाई आदी गावांना मोठा फटका बसला असून कपाशी, तूर, हरभरा, गहू बागायती पिके विशेष म्हणजे संत्रा मृगबहाराचा संत्रा गारपिटीत सापडल्याने शेतकºयांच्या हाताशी आलेले संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखो रूपयाचा संत्रा जमिनीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या अनेक वर्षापासून संकटात सापडलेल्या शेतकºयाला दरवर्षी काहीना काही संकटांना तोंड द्यावेच लागते. तरी शासनाने त्वरीत शेतकºयाचे शेतात जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून शेतकºयांना शासकीय मदत देण्यात यावी, ही मागणी जोर धरत आहे
तिवसा-चांदूर बाजार मार्ग बंद
ाारपीटसह वादळी पाऊस आल्यामुळे नेरपिंगळाई ते लेहेगाव मार्गावरील निंबाची झाडे पडल्यामुळे काही काळ तिवसा-चांदूर बाजार रोडवरील बससेवा बंद होती. मार्ग मोकळा केल्यानंतर बससेवा सुरळीत पूर्ववत सुरू झाली.