दारापुरात कोसळल्या गारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:23 IST2019-06-06T01:23:22+5:302019-06-06T01:23:38+5:30

ज्याच्या आगमनासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सूनपूर्व अर्थात वळिवाचा पाऊस तालुक्यात गारपीट घेऊन आला. बुधवारी दुपारी ३.५० वाजता अचानक वारे वाहू लागले.

Hail grows in Darapura | दारापुरात कोसळल्या गारा

दारापुरात कोसळल्या गारा

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : ज्याच्या आगमनासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सूनपूर्व अर्थात वळिवाचा पाऊस तालुक्यात गारपीट घेऊन आला. बुधवारी दुपारी ३.५० वाजता अचानक वारे वाहू लागले. नंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास दर्यापूर शहरासह तालुक्याला रोहिणीच्या पावसाने चिंब केले. दारापूर येथे दर्यापूर ते अमरावती मार्गावरील बशीर शाह न्याजू शाह यांच्या घरावर झाड कोसळले. त्यामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे.
वलगाव परिसरातदेखील पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या तप्त झळांनी हैराण झालेल्या अमरावतीकर ग्रामस्थांना या मान्सूनपूर्व पावसाने प्रचंड दिलासा दिला आहे.

Web Title: Hail grows in Darapura

टॅग्स :Rainपाऊस