रामपुरी कॅम्पमधून १०.४३ लाखांचा गुटखा जप्त गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई : व्यापारी अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: May 30, 2025 20:31 IST2025-05-30T20:30:41+5:302025-05-30T20:31:15+5:30

केसवानी याने आपल्या राहत्या घरात प्रतिबंधित गुटख्याची मोठी साठवणूक केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे प्रमुख पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांना मिळाली होती.

Gutkha worth 10.43 lakhs seized from Rampuri camp, Crime Branch Unit One action: Businessman arrested | रामपुरी कॅम्पमधून १०.४३ लाखांचा गुटखा जप्त गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई : व्यापारी अटकेत

रामपुरी कॅम्पमधून १०.४३ लाखांचा गुटखा जप्त गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई : व्यापारी अटकेत

प्रदीप भाकरे 

अमरावती : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने स्थानिक रामपुरी कॅम्प भागातील एका घरातून सुमारे १०.४३ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ३० मे रोजी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तेथून राजेश भगवानदास केसवानी (४८, रा. रामपुरी कॅम्प) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

केसवानी याने आपल्या राहत्या घरात प्रतिबंधित गुटख्याची मोठी साठवणूक केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे प्रमुख पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांना मिळाली होती. त्याआधारे शुक्रवारी दुपारी केसवानी याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनादेखील पाचारण करण्यात आले. जप्त मालाचा पंचनामा करण्यात आला.

केसवानी याने सुमारे २० विविध ब्रँडच्या १०.४३ लाख रुपये किमतीच्या गुटखा साठवून ठेवला होता. केसवानी याचे सक्करसाथ भागात राजेश ट्रेडर्स नामक किराणा दुकान आहे. तेथून तो प्रतिबंधित गुटखा विकत होता, अशी पूरक माहितीही पोलिसांना मिळाली. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटख्यावरील ही चौथी कारवाई ठरली आहे.

Web Title: Gutkha worth 10.43 lakhs seized from Rampuri camp, Crime Branch Unit One action: Businessman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.