शाळेत गुरुजींची २५ टक्केदेखील हजेरी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:17+5:302021-06-17T04:10:17+5:30

काही शाळांमध्ये कागदावरच शिक्षकांची कामे, ऑनलाईन शिक्षणाबाबत तक्रारी अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. मात्र, शासनाने ...

Guruji's attendance at school is not even 25%! | शाळेत गुरुजींची २५ टक्केदेखील हजेरी नाही!

शाळेत गुरुजींची २५ टक्केदेखील हजेरी नाही!

काही शाळांमध्ये कागदावरच शिक्षकांची कामे, ऑनलाईन शिक्षणाबाबत तक्रारी

अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. मात्र, शासनाने शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक केले आहे. असे असले तरी काही शाळांमध्ये शिक्षकांची हजेरी कागदोपत्रीच होती. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने गुरुजींचे चांगभलं असे चित्र आहे.

कोरोनाकाळात शिक्षण ‘लॉक’ आहे. आता तरी शाळा सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, मध्यंतरी महसूल खात्याने शिक्षकांची वेगवेगळ्या जबाबदारी हाताळण्यासाठी कर्तव्यावर नेमणूक केली होती. दरम्यान वाईन शॉपीवरही गुरुजींची नोंदणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर उमटला होता. महसूल, पोलिसांच्या मदतीसाठी शिक्षकांची नियुक्ती झाली होती. मात्र, असे असले तरी ७० टक्के गुरुजींनी कोरोना काळात बसूनच वेतन घेतले, असे वास्तव आहे. ना ऑनलाईन शिकवणी, ना ऑनलाईन अभ्यासक्रम असा सुखद काळ काही शिक्षकांचा गेला, यात दुमत नाही.

---------------------

जिल्ह्यात शाळा आणि शिक्षक

प्राथमिक शाळा : १९४९

माध्यमिक शाळा : ७४४

--------

प्राथमिक शिक्षक : ५२२५

माध्यमिक शिक्षक : ३४५०

-----------------------

तालुकानिहाय उपस्थिती

प्राथमिक माध्यमिक

अचलपूर : १६४ ७२

अमरावती : १२४ ४८

अंजनगाव सुर्जी : १२० ४९

भातकुली : ११६ ३५

चांदूर बाजार : १२९ ५३

चिखलदरा : १७१ ३७

चांदूर रेल्वे : ७४ २३

दर्यापूर : १४९ ५९

धारणी : १७३ ३३

धामणगाव रेल्वे : ९१ ३०

मोर्शी : ११५ ४९

नांदगाव खंडेश्र्वर : १२८ ३५

तिवसा : १०७ २६

वरुड : १२७ ५६

अमरावती महापालिका : ६३ १४०

----------------

शिक्षक काय म्हणतात?

‘‘ कोरोनाकाळातही शाळा सुरूच होती. ऑनलाईन शिक्षक अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांचे अध्यापन करावे लागले. केवळ कठोर संचारबंदीच्या काळातच शाळेत जाता आले नाही. एरव्ही शाळेचे कामकाज निरंतर होते.

- सुरेश माेलके, शिक्षक

----------

‘‘ शिक्षकांना पूर्णपणे आराम मिळाला असे म्हणता येणार नाही. ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणे, अभ्यासातील अडचणी सोडविणे ही कामे करावीच लागली. विद्यार्थ्यांविना शाळा असल्या तरी अन्य कामांपासून शिक्षकांची सुटका नाही.

- वैशाली परतेकी, शिक्षिका.

-------------

कोरोना काळात शासन निर्देशानुसार मुख्याध्यापक अथवा एक शिक्षक शाळेत हजर राहत होते. ऑनलाईन शिक्षणाच्यावेळी विषय शिक्षकांना शाळेत अनिवार्य केले होते. शासन निर्देशाचे पालन करूनच गुरुजींना शाळेत बाेलावण्यात आले.

- ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अमरावती.

--------

Web Title: Guruji's attendance at school is not even 25%!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.