गुरुजींनाही आता प्रवास रजा सवलत

By Admin | Updated: July 18, 2015 00:13 IST2015-07-18T00:13:01+5:302015-07-18T00:13:01+5:30

शिक्षकांना लागू होणाऱ्या प्रवास रजा सवलतीच्या तरतुदीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव व त्याबाबतचे प्रारुप...

Guruji has now also given the travel leave concession | गुरुजींनाही आता प्रवास रजा सवलत

गुरुजींनाही आता प्रवास रजा सवलत

अमरावती : शिक्षकांना लागू होणाऱ्या प्रवास रजा सवलतीच्या तरतुदीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव व त्याबाबतचे प्रारुप वित्त विभागास सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाचे अवर सचिव यांनी दिले आहेत. यामुळे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणारी प्रवास रजा सवलत आता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यापूर्वी प्रवास भत्ता दिला जात होता. मात्र प्रवास रजा सवलतीसंदर्भातील १० जून २०१५ च्या शासन निर्णयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या गावी जाण्यासाठी चार वर्षांतून दोनदा स्वग्राम किंवा एक महाराष्ट्र दर्शन व एक स्वग्राम प्रवास रजा सवलत मिळते. त्याप्रमाणे शासकीय निमशासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही सवलत मिळावी, अशी मागणी करण्यात येत होती. आता राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबत पुढाकार घेतल्याने शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही ही सवलत मिळू शकणार आहे. यासाठी विविध शिक्षक संघटनांनी शासनाकडे मागणी केली होती. (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सर्वशिक्षा अभियानाकरिता सुमारे ३५ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच जिल्हा परिषद व महापालिका शिक्षण विभाग मिळून याबाबत नियोजन केले जाणार आहे
- श्रीराम पानझाडे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद .

Web Title: Guruji has now also given the travel leave concession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.