पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते तिरंग्याला सलामी

By Admin | Updated: August 17, 2015 00:09 IST2015-08-17T00:09:07+5:302015-08-17T00:09:07+5:30

भारतीय स्वातंत्र्याचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

Guardian Minister Praveen Potte inaugurated the tricolor | पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते तिरंग्याला सलामी

पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते तिरंग्याला सलामी

ध्वजारोहण : शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शासनाची भरीव कामगिरी
अमरावती : भारतीय स्वातंत्र्याचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) लखमी गौतम उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील विकासकामांचा ठळक आढावा घेतला. त्यामध्ये १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना १३०० कोटी रुपये पीककर्ज वाटप, ४० हजार शेतकऱ्यांना ३५३ कोटींचे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यासोबतच शेतकरी सावकार कर्जमुक्तीकरिता २२ कोटी मंजूर करण्यात आले. पीक विमा योजनेत १ लाख १६ शेतकऱ्यांना ८४ कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. नवीन भूसंपादन कायद्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या पाचपट वाढीव दर मिळणार असल्याचेही ना. पोटे यांनी सांगितले.
जिल्ह्यात दरवर्षी १७५० याप्रमाणे तीन वर्षांत ५२५० विहिरींचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात १२ हजार ५०० टी.सी.एम. जलसाठा निर्माण झाला आहे.
१० हजारपेक्षा जास्त हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. उद्योग क्षेत्रात अमरावती जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कचा शुभारंभ झाला असून २२४० कोटींच्या गुंतवणुकीतून ४७७२ लोकांना रोजार मिळणार आहे. जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या मेळघाटात सोलर ऊर्जने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ३० हजार कोटींचा मुंबई नागपूर सहापदरी एक्सप्रेस वे प्रस्तापित केला जाणार आहे. शहरातील काँक्रीट रस्ते व पुलाकरिता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सीआरएफ फंडामधून ३६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा विकासासाठी नियोजन समितीने बजेट १५० कोटीवरुन २१८ कोटी केले आहे. अमरावतीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केल्याने शहराचा विकास नियोजित पद्धतीने होण्यास गती मिळेल. जिल्ह्यातील २ लाख शेतकऱ्यांना अन्न, सुरक्षेचे कवच लाभणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना ३ रुपये किलो तांदूळ व २ रुपये किलो गहू याप्रमाणे अन्न सुरक्षा मिळणार आहे.
यावेळी आमदार अनिल बोंडे, राजेंद्र गवई, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्वातंत्र्य सैनिक महादेवराव मोरे, राज्य माहिती आयुक्त डी.आर. बनसोड व सर्व विभागांचे महत्त्वाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Guardian Minister Praveen Potte inaugurated the tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.