दंडाच्या रकमेवरही जीएसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:51+5:30
अनेकदा गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी दरवाज्यातील पायऱ्यांवर उभे राहून प्रवास करतात. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी तिकीट वाहकाकडून तिकीट घेत नसल्याचे चित्र आहे. पैशांची मागणी केल्यास जवळच्या स्टेशनवर उतरून पुढील बसची प्रतीक्षा करतात, अशा प्रवाशांकडून वसूल होणारा दंड महामंडळाचे उत्पन्नवाढीस मदतगार ठरणार आहे. यामुळे या उत्पन्नावर १८ टक्के वस्तू व सेवा कर लावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.

दंडाच्या रकमेवरही जीएसटी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एसटीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दुहेरी फटका बसणार आहे. विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास दंडाच्या रकमेचा त्यावर वस्तू व सेवा कर सहीत जीएसटी भरावा लागणार आहे. एसटी महामंडळाने जिल्ह्यासह सर्व तिकीट तपासनिसांना तसे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे किमान १०० रुपयांचा दंडावर २० रुपयांचा कर आकारला जाणार आहे.
एसटी महामंडळातील अनेक बसगाड्यांना दोन्ही बाजूंनी दरवाजे आहेत. गर्दीमुळे प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहोचण्यात तिकीट तपासनिसांना अडचणी येतात. अनेकदा गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी दरवाज्यातील पायऱ्यांवर उभे राहून प्रवास करतात. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी तिकीट वाहकाकडून तिकीट घेत नसल्याचे चित्र आहे. पैशांची मागणी केल्यास जवळच्या स्टेशनवर उतरून पुढील बसची प्रतीक्षा करतात, अशा प्रवाशांकडून वसूल होणारा दंड महामंडळाचे उत्पन्नवाढीस मदतगार ठरणार आहे. यामुळे या उत्पन्नावर १८ टक्के वस्तू व सेवा कर लावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. अमरावती जिल्ह्यासह ३१ विभागांना महामंडळातर्फे यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांकडून शंभर रुपये किंवा चुकलेल्या प्रवासी भाड्याच्या दुप्पट यापैकी जी रक्कम अधिक असेल ती वसूल करण्याचा नियम एसटी महामंडळाचा आहे. त्यामुळे आता विनातिकीट प्रवास करणाºयांना दंडाच्या रक्कमेसह जीएसटीचा भुर्दंडही पडणार आहे.