शेंडगाव, रिद्धपूरसह माधानचा विकास आराखडा व्हावा
By Admin | Updated: December 28, 2015 00:16 IST2015-12-28T00:16:56+5:302015-12-28T00:16:56+5:30
गेल्या १५ वर्षाच्या काळात झाली नाही, इतकी विकासाची कामे वर्षभरात होणार असल्याचा आशावाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ...

शेंडगाव, रिद्धपूरसह माधानचा विकास आराखडा व्हावा
पालकमंत्री : मुख्यमंत्र्यांकडे साकडे, जिल्हा चकाकणार
अमरावती : गेल्या १५ वर्षाच्या काळात झाली नाही, इतकी विकासाची कामे वर्षभरात होणार असल्याचा आशावाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दसरा मैदानातील भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला. येत्या काळात जिल्ह्यातील सर्व रस्ते सिमेंटचे होणार असल्याचे ते म्हणाले. चिखलदरा येथील हायड्रो प्रोजेक्ट, भारत डायनॅमिक, सिडको पर्यटन विकास आराखडा या सोबतच रिद्धपूरसह गुलाबराव महाराज व गाडगे महाराजांच्या जन्मस्थळांचा विकास आराखडा करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी काळात जिल्ह्याची भरभराट होणार असल्याचा प्रखर आशावादही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
पापळच्या विकासासाठी १३ कोटी
बहुजन समाजाला शिक्षण मिळावे, यासाठी भाऊसाहेबांनी शिक्षण संस्था काढल्यात. त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहेत. त्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी नेहमीच योेगदान देऊ, असे आश्वासन देत पालकमंत्री प्रवीण पोेटे यांनी भाऊसाहेबांचे जन्मगाव असलेल्या पापळच्या विकासाकरिता जिल्हा नियोेजन समितीच्या बैठकीत १३ कोटी रूपये मंजूर केल्याचे सांगितले.