शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यात कावीळच्या आजारात वाढ

By admin | Updated: August 7, 2015 00:27 IST

ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा उदासीनपणा यामुळे तब्बल वीस गावांत दूषित पाणी पुरवठा होत आहे.

२० गावांत दूषित पाणी : ताप, उलट्यांचा प्रादुर्भावधामणगाव रेल्वे : ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा उदासीनपणा यामुळे तब्बल वीस गावांत दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे कावीळच्या रूग्णांची संख्यादेखील वाढली आहे.तालुक्यात गत जून व जुलै महिन्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाण्याचे नमुने तपासण्यात आलेत़ तळेगाव दशासर परिसरातील ३५ नमुन्यांपैकी चार गावांतील बारा पाणी नमुने दूषित आढळले. तर अंजनसिंंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विभागात २७ पैकी सर्वाधिक ८ ठिकाणी पिण्याच्या पाण्यात दोष आढळला. मंगरूळ दस्तगीर परिसरात १६ नमुन्यांपैकी चार पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आल तर निंबोली परिसरात ८७ पैकी ५ गावांत पाणी नमुन्यात दोष आढळला़ ग्रामीण भागात ब्लिचिंग पावडर टाकताना कोणत्याही मापदंडाचा उपयोग होत नसल्याने दूषित पाण्याचा पुरवठा सुरू असल्याचे दिसत आहे़ तालुक्यातील ४० गावांत अद्यापही शेणाच्या खतांचे ढिगारे कायम आहेत. ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देऊनही संबंधितांनी शेणखत न उचलल्यामुळे हे खताचे ढिगारे ग्रामस्थांच्या जीवावर बेतत आहेत. पाण्याच्या स्त्रोत लिक असल्यामुळे दूषित पाणी पिल्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नाहीत़ ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहे त्या ठिकाणापासून १५ मीटर अंतरावरील सर्व जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे़ परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही या सूचनेचे पालन होत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे़तालुक्यातील २० ते २५ गावांतील ग्रामीण रूग्ण शहरात दररोज येत आहेत़ अशक्तपणा, ताप येणे, पोटाच्या उजव्या भागात दुुखणे, डोळ्यांचा, त्वचेचा रंग पिवळा होणे, मळमळ उलट्या होणे, भूक मंदावणे, अतिसार होणे, पिवळ्या गडद रंगाची लघवी होणे अशा रूग्णांत वाढ झाली आहे़ हे रूग्ण खासगी दवाखान्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय रूग्णालयात रूग्णांची गर्दी वाढली आहे़ दूषित पाणी पिल्यामुळे या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले़ यकृतावार सूज आल्यामुळे कावीळची लागण होत असल्याची प्राथमिक माहिती या डॉक्टरांनी दिली़ जीवावर बेतणाऱ्या या आजारापासून सुटका करून घेण्यासाठी सर्वाधिक सोपा उपाय म्हणजे स्वच्छ व निर्जंतुक पाणी पिणे हा आहे़ ग्रामपंचायतीने स्वच्छ पाणी ठेवण्यासंदर्भात खबरदारी घ्यावी तसेच ग्रामस्थांनीही या बाबीला सहकार्य करावे, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतून होत आहे़