अल्पवयीन विद्यार्थिनीला मद्य पाजून सामूहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:01 IST2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:01:01+5:30
रविवारी पीडित मुलगी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर घरी परत येत असताना त्या ओळखीच्या युवकाने तिच्या इच्छेविरुद्ध तिला दुचाकीवर बसविले. यासाठी त्याच्या एका मित्राने मदत केली. तिघेही एकाच दुचाकीने निघाले. एका घरात तिला नेण्यात आले. तेथे दोन्ही मित्रांनी दारू ढोसली. त्यांनी त्या मुलीलाही मद्य पिण्यास बाध्य केले. यानंतर दोन्ही आरोपी मुलीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.

अल्पवयीन विद्यार्थिनीला मद्य पाजून सामूहिक अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या १५ वर्षीय विद्यार्र्थिनीला दोन युवकांनी मद्य पाजून सामूहिक अत्याचार केल्याची घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी ११.३० च्या सुमारास शहरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. दुसरा आरोपी पसार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दोन्ही आरोपी पीडिताच्या घराजवळ राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीची १९ वर्षीय आरोपीसोबत एक महिन्यापूर्वी ओळख झाली. रविवारी पीडित मुलगी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर घरी परत येत असताना त्या ओळखीच्या युवकाने तिच्या इच्छेविरुद्ध तिला दुचाकीवर बसविले. यासाठी त्याच्या एका मित्राने मदत केली. तिघेही एकाच दुचाकीने निघाले. एका घरात तिला नेण्यात आले. तेथे दोन्ही मित्रांनी दारू ढोसली. त्यांनी त्या मुलीलाही मद्य पिण्यास बाध्य केले. यानंतर दोन्ही आरोपी मुलीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास पीडितेला तिच्या घरापासून काही अंतरावर सोडून देण्यात आले. घटनेची वाच्यता केल्यास परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकी त्या दोघांनी मुलीला दिली. घाबरलेल्या मुलीने मोठ्या हिमतीने हा प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. दुसऱ्या दिवशी सोमवारी पीडिताने संबंधित ठाण्यात अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी एका आरोपी युवकाला अटक केली. दुसरा आरोपी फरार आहे. त्याच शोध पोलीस घेत आहेत.
दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (३), ३७६ (डी, ए), ३२३, ३४२, ५०६ तसेच पोक्सो ४, ६ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अधिकारी करीत आहेत.
प्रजासत्ताक दिनी दोन आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडिताने दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवून एका आरोपीला अटक केली. दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
पोलीस अधिकारी, अमरावती शहर
दोघांविरुद्ध यापूर्वी गुन्ह्याची नोंद
दोन्ही आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. यापूर्वी दोघांविरुद्ध वाटमारीचे कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.