पुजाऱ्यांची समूहाने पोलीस ठाण्यात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2017 00:02 IST2017-02-12T00:02:06+5:302017-02-12T00:02:06+5:30

अमरावती : दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार पंडित विनोद पांडे यांचा मृत्यू झाला.

The group of priests runs to the police station | पुजाऱ्यांची समूहाने पोलीस ठाण्यात धाव

पुजाऱ्यांची समूहाने पोलीस ठाण्यात धाव

अमरावती : दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार पंडित विनोद पांडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पुजाऱ्यांनी समूहाने पोलीस ठाणे व पोलीस आयुक्तालयावर धाव घेतली.
राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात शुक्रवारी रात्री दुचाकीच्या धडकेत विनोद पांडे याचा मृत्यू झाला. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी दुचाकीस्वारविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३०४(अ) अन्वये गुन्हा नोंदविला. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. विनोद पांडे यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. त्यांना मदत मिळावी, या उद्देशाने शनिवारी शेकडो पुजाऱ्यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले होते. यामध्ये आनंद सोळंकी, सिध्दीकांत पांडे, चंदन पांडे, भगिरथ पांडे, धनजंय पांडे, रोहीत पांडे, अनिरुध्द पांडे, मिथीलेश पांडे, सतरोधन पांडे नितेश पांडे, कुमोद पांडे यांच्यासह इतर अनेक पुजारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The group of priests runs to the police station