फिजिकल डिस्टंसिंग ठेवून भाऊसाहेबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:21+5:302020-12-27T04:10:21+5:30
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता यंदा अतिशय साध्या पद्धतीने शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती ...

फिजिकल डिस्टंसिंग ठेवून भाऊसाहेबांना अभिवादन
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता यंदा अतिशय साध्या पद्धतीने शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय श्री. शिवाजी शिक्षण संस्थेने घेतला आहे. पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत पंचवटी चौकातील भाऊसाहेबांच्या पीर्णाकृती पुतळ्याला रविवारी सकाळी ९ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे.
गत तीन दिवसापूर्वीच पंचवटी चौकातील भाऊसाहेबांचा पूर्णाकृती पुतळा तसेच स्मृती भवन केंद्राच्या इमारतीवर आकर्षण रोषणाई करण्यात आली होती.
यंदा भाऊसाहेबांच्या जयंती उत्सहानिमित्त श्री. शिवाजी शिक्षण संस्था स्वत:चे यु- ट्यूब चॅनल वाहिनीचा शुभारंभ करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिली. याव्दारे सर्व आजीवन सदस्य तसेच शिव परिवारातील शिक्षकांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्याची लिंक रविवारी सकाळी ११ वाजता पाठविण्यात येणार आहे. शिव परिवारातील सर्व सदस्यांची आपल्या भ्रमणध्वनीवरून या यु- ट्यूब वाहिनीव्दारे भाऊसाहेबांची जयंती साजरी करता येईल. हा अवस्मरणीय क्षण आपण आपल्या हदयातील एका कप्प्यात जपूण ठेवावा. भाऊसाहेबांच्या पुतळ्याजवळ कुणीही गर्दी करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी २०२१ ची दैनंदिनी व शिव संस्था त्रैमासिक अंकाचे प्रकाशनही अध्यक्षांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
बॉक्स
घरूनच साजरी करा जयंती
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा सर्वांनी घरी राहूनच लोकमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेसमोर फुलवात प्रज्वलीत करून त्यांना अभिवादन करावे तसेच जंयतीनिमित्त निश्चयरुपात तोंडाला मास्क लावून व शारीरिक अंतर ठेवूनच घाराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले.
बॉक्स
शाळा, कॉलेजला मार्गदर्शक सूचना
यंदा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व, शाळा, काॅलेजला श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. त्यात भाऊसाहेबांची जयंती भव्य स्वरूपात साजरी करता येणार नाही, असा उल्लेख केला आहे. यंदा भाऊसाहेबांची जयंती अंत्यत साध्या पद्धतीने साजरी करावी. गर्दी टाळावी. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊन साध्या पद्धतीने भाऊसाहेबांची जयंती साजरी करावी, अशा सूचना करण्यात आलेल्या असे संस्था सचिव शेषराव खाडे यांनी सांगितले.