हरभऱ्याला केवळ ३९०० रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:20+5:30

अंजनगाव बाजार समितीच्या आवारात रबी शेतमाल विकण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा बाजार भरतो. यात परिसरातील आणि गावातील शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. रविवारी बाजारपेठेत नवीन हरभरा दाखल झाला. शासनाने हरभऱ्याचा हमीभाव प्रतिक्विंटल ४ हजार ८०० रुपये ठरवला आहे. पण, तालुक्यात नाफेडचे नोंदणी व खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्याना हरभरा ३ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भावाने व्यापाऱ्याना तो विकावा लागत आहे. कवडीमोल दर मिळत असल्याच्या शेतकऱ्याच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.

Green Only Rs3900 Rate | हरभऱ्याला केवळ ३९०० रुपये दर

हरभऱ्याला केवळ ३९०० रुपये दर

ठळक मुद्देहमीभावापेक्षा कमी : शेतकऱ्यांची तीव्र नाराजी; नाफेडचे केंद्र केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रविवारच्या बाजारात नवीन हरभºयाची आवक झाली. व्यापाºयांकडून प्रतिक्विंटल ३ हजार ७०० ते ३ हजार ९०० रुपये असा भाव मिळाला आहे. तो हमीभावाच्या तुलनेत तब्बल एक हजार रुपये कमी आहे. त्यामुळे येथे नाफेडचे खरेदी कें द्र केव्हा सुरू होणार, असा शेतकऱ्याचा सवाल आहे.
अंजनगाव बाजार समितीच्या आवारात रबी शेतमाल विकण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा बाजार भरतो. यात परिसरातील आणि गावातील शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. रविवारी बाजारपेठेत नवीन हरभरा दाखल झाला. शासनाने हरभऱ्याचा हमीभाव प्रतिक्विंटल ४ हजार ८०० रुपये ठरवला आहे. पण, तालुक्यात नाफेडचे नोंदणी व खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्याना हरभरा ३ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भावाने व्यापाऱ्याना तो विकावा लागत आहे. कवडीमोल दर मिळत असल्याच्या शेतकऱ्याच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. शेतकऱ्याला प्रतिक्विंटल १ हजार ते १२०० रूपये नुकसान होत आहे. त्याअनुषंगाने हरभरा नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. या बाजारपेठेत तुरीची आवक सुरू असून, तुरीला ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

चिंचोली बु. व अंजनगाव सुर्जी खरेदी-विक्री सोसायटीत हरभरा पिकाची नोंदणी सुरू आहे. येत्या चार ते पाच दिवसांत तेथे खरेदी सुरू केली जाईल.
- गजानन नवघरे
सचिव, बाजार समिती

हमीभाव केंद्रांवर खरेदी सुरू न झाल्यामुळे आम्हाला आमचा हरभरा बेभाव विकावा लागत आहे. हमीभावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल सुमारे एक हजार रूपये नुकसान होत आहे.
- राजेंद्र भांबूरकर
शेतकरी

Web Title: Green Only Rs3900 Rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती