भरपावसाळ्यातही मिळेना जनावरांना हिरवा चारा
By Admin | Updated: August 5, 2014 23:14 IST2014-08-05T23:14:13+5:302014-08-05T23:14:13+5:30
यंदा सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर उशीरा का होईना पावसाने हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला. मात्र भर पावसाळ्यातही डोंगराळ जमीनी ओसाड असल्याने शेतकऱ्यांचा पशुधन

भरपावसाळ्यातही मिळेना जनावरांना हिरवा चारा
जितेंद्र दखने - अमरावती
यंदा सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर उशीरा का होईना पावसाने हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला. मात्र भर पावसाळ्यातही डोंगराळ जमीनी ओसाड असल्याने शेतकऱ्यांचा पशुधन जगविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. यंदा तर निम्यापेक्षा जास्त पावसाळ्याचा कालावधी निघून गेला तरी हिरवा चारा नाही. पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून महागडा चारा खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने चारा छावण्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, महापूर अशा विविध संकटाचा शेतकऱ्यांना सतत सामना करावा लागत आहे. पावसाळ्याची दोन महिने लोटली तरी डोंगरमाथ्यावरील हिरवळ दुरापास्त झाल्याने जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. तीन वर्षांपासून विविध संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही पावसाने हुलकावणी दिली.
पावसाळ्यात मका, बाजरीचे सरमाड आणि ज्वारीची वाढ खुंटल्याने हिरव्या चाऱ्याची टंचाई भासत आहे. पावसाळा सुरू होताच महिनाभरात डोंगरमाथे हिरवीगार होऊन जनावरांना मुबलक चारा उपलब्ध होतो. मात्र यंदा पावसाअभावी श्रावण महिना उजाडला तरी हिरवळीअभावी डोगराळ भाग उजाड असल्याचे दिसून येते. त्यामुळे पशुधन कसे वाचवावे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे.