हिरवी मिरची तिखट; मिळाला ‘रेकार्डबे्रक’ भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:43+5:30
राजुरा येथील हिरव्या मिरचीचे मार्केट सुरू झ्नाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मिरचीला चढा भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे. हिरवी मिरची तालुक्यात ‘कॅश क्रॉप’ म्हणून ओळखली जाते. मिरची मार्केट उघडले की भाव हा प्रथम मुद्दा असतो. दीड दशकात शेतकरी हिरव्या मिरचीचे पीक घेण्यासाठी सरसावला आहे.

हिरवी मिरची तिखट; मिळाला ‘रेकार्डबे्रक’ भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा बाजार : एरवी २२०० ते २५०० रूपये प्रतिक्विंटल भाव असलेली हिरवी मिरची यंदा चांगलीच भाव खाऊन गेली आहे. यंदा या आठवड्यात मिरचीला रेकॉर्डबे्रेक ४५०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जबलपूर, रायपूर, वाशी व दिल्ली मार्केटमधून मागणी वाढल्याने ही भाववाढ मिळाली आहे.
राजुरा येथील हिरव्या मिरचीचे मार्केट सुरू झ्नाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मिरचीला चढा भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे. हिरवी मिरची तालुक्यात ‘कॅश क्रॉप’ म्हणून ओळखली जाते. मिरची मार्केट उघडले की भाव हा प्रथम मुद्दा असतो. दीड दशकात शेतकरी हिरव्या मिरचीचे पीक घेण्यासाठी सरसावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एरवी रात्री उशिरापर्यंत पर्यंत चालणारी येथील बाजार पेठ आवक फारशी नसल्याने रात्री ९ पर्यंत उघडी असते.
५ ते ६ हजार हेक्टर क्षेत्रावर मिरची उत्पादन
अचलपूर, मोर्शी, नरखेड, काटोल, पांढुर्णा येथील शेतकरीही राजुऱ्यात
दररोज शेकडो मजुरांना काम देणारे रात्रीचे मार्केट
भारतातील मोठ्या शहरातून हिरव्या मिरचीची मागणी अचनक वाढल्याने हे भाव मिळाले आहेत. शेतकऱ्यांकडून आवकही त्या प्रमाणात कमी आहे.
- दिलीप भोंडे,
व्यापारी, राजुरा बाजार
रेल्वेची माल वाहतूक बंद असल्याने मिरचीचा माल रस्त्याने पाठवावा लागतो. ते खर्चिक आहे तरीही भाव डिसेंबरपर्यंत चढेच राहतील.
- विजय बहुरूपी, दलाल, व्यापारी
मिरची मार्केट, राजुरा बाजार
मिरची पीक हे खर्चिक आहे. हेच भाव कायम राहावेत, अशी अपेक्षा आहे. शितगृहाअभावी साठवणूक करता येत नाही. शीतगृहाची निर्मिती शासनाने करावी.
-बाळकृष्ण गेडाम,
मिरची उत्पादक पवनी (संक्रांजी)