राष्ट्रसंतांच्या महासमाधीसमोर सरसंघचालक मोहन भागवत नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 20:35 IST2019-01-20T20:34:45+5:302019-01-20T20:35:35+5:30
मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी भेट दिली.

राष्ट्रसंतांच्या महासमाधीसमोर सरसंघचालक मोहन भागवत नतमस्तक
तिवसा (अमरावती) : मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी भेट दिली. आश्रमात दीड तास घालवला. तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीपुढे मोहन भागवत नतमस्तक झाले.
अमरावती येथून नागपूरकडे जात असताना मोहन भागवत गुरुकुंज मोझरी येथे थांबले. त्यांनी सर्वप्रथम तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्धन बोथे यांनी सरसंघचालकांना महासमाधीसमोर असलेल्या विचारधनाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर सरसंघचालकांनी तुकडोजी महाराज यांनी स्वत: बांधलेल्या आश्रमाची निरखून पाहणी केली. आश्रमातील स्वच्छता पाहून ते भारावले. त्यांनी आश्रमात थांबून गुरुदेव भक्तांशी चर्चा केली.
यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांनी मोहन भागवत यांना ग्रामगीता भेट दिली. यावेळी डॉ. राजाराम बोथे, भाजप नेत्या निवेदिता दिघडे, सभापती अर्चना वेरूळकर, दिलीप कोहळेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.