शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलसाठी १९६.९२ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:57 PM

शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकरिता १९६ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले आहे.

ठळक मुद्दे२५ नवीन पाणीपुरवठा योजनाराज्यात १,००३ पाणीपुरवठा योजना राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात भूजलस्तरात घट झाली आहे. भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मराठवाडा, विदर्भातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही दाहकता लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकरिता १९६ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व ग्रामीण जनतेस स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविला जात आहे. यात एकूण १,००३ नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, १७ जानेवारी २०१८ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून २६२ कोटी ६३ लाख ४४ हजार रूपये किमतीच्या ११९ पाणीपुरवठा योजना वगळण्यात आल्या आहेत. या ११९ पाणीपुरवठा योजना अन्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. नव्याने २५ ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय झाला असला तरी कायम पाण्याचे स्त्रोत न तपासता पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर हजारो कोेटी रूपये खर्च होत असताना पाण्याची समस्या दूर होत नाही, हे वास्तव आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्यापूर्वी कायम पाण्याचे स्त्रोत निवडले जात नाही. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीमार्फत ही योजना राबविली जात असल्यामुळे त्यावर खर्च होणारा निधी व्यर्थ ठरत असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परीक्षणातून यापूर्वी स्पष्ट झाले आहे.येथे राबविणार नवीन पाणीपुरवठा योजनाजालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, खेडगाव व जालना तालुक्यातील ९२ गावांचा ग्रीड पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील पालम व गंगाखेड तालुक्यातील ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेत आहेत. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड, औरंगाबादच्या सावरखेड, लातूरचे तळणी तर सांगली जिल्ह्यातील येलूर, नायगाव, शिरगाव, पडवळवाडी, शेखरवाडी, कोळे ही गावे समाविष्ट केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद, उमळवाड, घालवाल, बुबनाळ, राक्षी, धबधबेवाडी, निकमवाडी, पिंपळे, सातवे, जाफळे, कणेरी, शेंबवणे, मानोली, सावर्डे खु., परखंदळे, जाधववाडी, येलूर या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Waterपाणी