शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांचे कुपोषण निर्मूलन मिशन

By admin | Updated: November 9, 2014 22:26 IST

मेळघाटच्या कुप्रसिद्ध कुपोषणाचा कलंक पुसून काढण्यासाठी अंगणवाड्यांना सोई, सुविधांनी सज्ज करुन गरोदर मातांना अंडी, दूध मोफत दिले जाईल, अशी माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी धारणी

अमरावती : मेळघाटच्या कुप्रसिद्ध कुपोषणाचा कलंक पुसून काढण्यासाठी अंगणवाड्यांना सोई, सुविधांनी सज्ज करुन गरोदर मातांना अंडी, दूध मोफत दिले जाईल, अशी माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी धारणी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यापुढे मेळघाटात 'कुपोषण निर्मूलन मिशन' राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.धारणी येथील उपविभागीय कार्यालयात आदिवासींना वैयक्तिक लाभाच्या जमिनीचे पट्टे वाटप कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आदिवासींच्या हक्कावर कोणीही गदा आणू शकत नाही. कारण राज्य घटनेने आदिवासींना पाचव्या सूचीनुसार हक्क प्रदान केले असून हे हक्क अबाधित राहावे, यासाठी राज्यपालांना विशेषधिकार वापरण्याचा अधिकार बहाल केल्याचे राज्यपाल राव यांनी सांगितले. दरम्यान प्रशासनाने ठरविलेल्या गावांत दौरे न करता आडवळणाच्या गावांत जाऊन वस्तुस्थिती बघावी का, असा प्रश्न प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला असता राज्यपालांनी तो प्रयोगही पुढच्या वेळेस अवलंबविला जाईल, अशी खात्री दिली. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही मेळघाटातील २५ गावांत वीज पोहचली नाही, या प्रश्नांवर बोलताना राज्यपालांनी मध्यप्रदेशातून वीज आणण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्याकरिता निधी उपलब्ध असून लवकरच मेळघाटतील काळोखात असलेली गावे प्रकाशमय होतील, अशी आशा व्यक्त केली. कुपोषणमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मान्य करीत गावातील अंगणवाड्यांना सर्व सोई, सुविधांनी सज्ज करण्यावर भर दिला जाईल. गरोदर मातांना अंडी व दूध मोफत देण्याचे आदेश बजावले असून याची अंमलबजावणी त्वरेने केली जाईल, असे त्यांनी सांगितले. रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी स्थानिक आदिवासींना रोजगार मिळावा, यासाठी पर्यटनवाढीस प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. पर्यटनांचा विकास झाला की, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील, असे राज्यपाल म्हणाले. कुपोषणावर अंकुश ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांचे सचिव रस्तोगी, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)