शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

शासकीय निधीचा व्यवहार आता राष्ट्रीयकृत बँकेतूनच; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 20:26 IST

खासगी, सहकारी बँकांच्या जादा व्याजदराच्या आमिषाला ‘ब्रेक’ 

अमरावती : खासगी अथवा सहकारी बँकांमध्ये आतापर्यत झालेली फसवणूक, खातेदारांची रक्कम बुडीत होण्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. मात्र, आता शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेव म्हणून राहील. खासगी, सहकारी बँकांमध्ये हा निधी ठेवता येणार नाही, असा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने शुक्रवारी घेतला आहे. १ एप्रिल २०२० पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. 

येस बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारानंतर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आदींना त्यांच्याकडील सर्व बँकिंगविषयक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच करावे लागणार आहे. यापूर्वी खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही शासकीय योजनांचा निधी (वेतन व भत्ते व्यतिरिक्त) जमा करण्यासाठी उघडण्यात आलेली बँक खाती १ एप्रिलपासून बंद करून केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा करावी लागणार आहे. निवृत्तीवेतनधारकांनासुद्धा राष्ट्रीयकृत बँकांमधूनच व्यवहार करावे लागतील. सार्वजनिक उपक्रम,महामंडळांंना अतिरिक्त निधी गुंतवणूक राष्ट्रीय बँकांमध्ये ठेवावी लागेल, असे शासनाचे अवर सचिव इंद्रजित गोरे यांनी स्पष्ट केले आहे. 

ही आहे राष्ट्रीयकृत बँकांची यादी 

भारतीय स्टेट बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, कार्पोरेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे.

टॅग्स :Yes Bankयेस बँकBank of Indiaबँक ऑफ इंडियाBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारbankबँक