सोने चमकवून देण्याची बतावणी करणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:55 IST2018-09-14T21:54:53+5:302018-09-14T21:55:10+5:30
सोने चमकवून देण्याची बतावणी करीत महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. कुमोद साह वसुदेव साह ठठेरा (४२) व फुलचंद साह सुरेश साह (६०, दोन्ही रा. लक्ष्मीपूर बरारी, गुरुबाजार कटिहार, रा. बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने चमकवून देण्याचे सर्व साहित्य जप्त केले आहे.

सोने चमकवून देण्याची बतावणी करणारे गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोने चमकवून देण्याची बतावणी करीत महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. कुमोद साह वसुदेव साह ठठेरा (४२) व फुलचंद साह सुरेश साह (६०, दोन्ही रा. लक्ष्मीपूर बरारी, गुरुबाजार कटिहार, रा. बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने चमकवून देण्याचे सर्व साहित्य जप्त केले आहे.
मागील काही महिन्यांत शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी सोने चमकावून देण्याची बतावणी करून दागिने लंपास केल्याच्या काही घटना समोर आल्या आहे. शहरातील कोतवाली, गाडगेनगर, राजापेठसुद्धा या घटना घडल्या होत्या. सद्यस्थितीत गणेशोत्सव व महालक्ष्मी पूजनांचे पर्व सुरू असताना अनेक महिला दाग-दागिने चमकवून घेत असतात. सोने चमकावून देणारे भामटे अशाच संधीचा गैरफायदा घेऊन महिलांची फसवणूक करतात. या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपायुक्त प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राम गिते, शिपाई प्रकाश जगताप, जावेद अहमद, मो. सुलतान, इंद्रजित राठोड, निलेश पाटील व चालक संतोष रौराळे यांची शहरात पेट्रोलिंग सुरु होती.
दरम्यान, पोलिसांना खोलापुरी गेट हद्दीतील महाजनपुºयात एका घरासमोर दोन जण दागिने चमकावित असल्याचे आढळले. पोलिसांना चौकशीदरम्यान त्यांच्याकडे बरेच संशयास्पद साहित्य आढळले.