शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्राचा जनादेश घेण्यासाठी व जनतेला हिशेब देण्यासाठी निघालोय- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 16:18 IST

आज मला आनंद होतोय की, अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून या जनादेश यात्रेला सुरुवात होतीय, मी राजनाथ सिंह यांच्या स्वागत करतो,

- सूरज दाहाट

तिवसा- आज मला आनंद होतोय की, अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून या जनादेश यात्रेला सुरुवात होतेय, मी राजनाथ सिंह यांचे स्वागत करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. राजनाथ सिंह यांच्याच नेतृत्वात मी मुख्यमंत्री झालो, मी सगळ्यांचा जनादेश घ्यायला निघालोय व आम्ही केलेल्या कामाचा हिशेब देण्यासाठी आता निघालो आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमी या भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.दोन किलोमीटरपासून लोकांची प्रचंड गर्दी होते, याचा मला आनंद झाला. महाराष्ट्राच्या जनतेचा आदेश या ठिकाणी प्राप्त झालाय. महाजनादेश यात्रा जनतेचा आशीर्वाद घेण्याकरिता आहे. आमचं दैवत जनता आहे. पाच वर्षे आशीर्वाद दिला, आम्ही मालक नाही सेवक आहोत. त्यामुळे आम्ही केलेलं काम पूर्ण केलं की नाही विचारायला आलोय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता दिली, महाराष्ट्रातल्या गावामध्ये जाऊन पुन्हा एकदा यात्रेची सुरुवात करतोय, महाराष्ट्रात सगळ्या समस्या संपल्या असा दावा आम्ही करत नाही, मात्र गेल्या सरकारपेक्षा आम्ही त्यापेक्षा दुप्पट काम केलीत, तुमच्यापेक्षा दुप्पट काम केली नसणार तर जनादेश घ्यायला बाहेर पडणार नाही.काँग्रेसच्या काळात कृषी पंपासाठी कनेक्शन मिळू शकल नव्हतं, त्यात दीड लाख शेतकऱ्यांना कृषी पंपाचं कनेक्शन मिळालंय, भ्रष्टाचार करून सगळा पैसा सत्ताधाऱ्यांकडे जायचा सिंचनाची प्रचंड काम आमच्या सरकारने केलीत, गोसीखुर्दमध्ये 50 हजार हेक्टरचा सिंचन पुढला टप्पा 1 लाख सिंचनाचा असणार आहे, विदर्भात विजेचे भाव 3 रुपये (इंडस्ट्रीसाठी), समृद्धी महामार्गाच काम सुरू झालं, देशातला सर्वात मोठा एक्सप्रेस महामार्ग महाराष्ट्रात, पुढल्या वर्षीच्या शेवटपर्यंत काम पूर्ण होईल, हे सरकार शेतकऱ्याच्याच पाठीशी आहे, कर्जमुक्ती, विमा, योजनांचा पैसे, दुष्काळी मदत असेल, पाच वर्षांत 50 हजार कोटींचे कर्जमाफी दिली, गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 30 हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार केले, 18 हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, देशामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना दुसरीकडे नाही, चार वर्षांत 50 हजार शौचालय, हागणदारीमुक्त शहर आणि ग्रामीण केलंय, 20 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय माहामार्ग तयार केले, शिक्षणात सुधार केला, महाराष्ट्रातला शिक्षणाचा क्रमांक 16 वा होता, केवळ 3 वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर आणलाय, जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढली. बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे, औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरकेंद्र सरकारने रोजगाराची निर्मिती किती झाली त्याच सर्वात मोठी आकडेवारो महाराष्ट्राची आहे, 25 टक्के रोजगार महाराष्ट्रात, आधीच्या सरकारमध्ये 3 लाख कुटुंब बचतगटाशी जोडले गेले होते, आमच्या सरकार आल्यानंतर 40 लाख कुटुंब बचत गटांशी जोडले, मोदींचे आभार पूर्वीचे मुख्यमंत्री दिल्लीत जायचे खाली हात परत यायचे, पण आम्ही जेव्हा दिल्लीत जातो तेव्हा मोदी भरभरून प्रेम आम्हाला देतात, आता हाऊसफुल झालं आहे, त्यामुळे आता प्रवेश नाही, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस