आम्हाला न्याय द्या, अन्यथा शेतमाल खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:00 AM2020-11-25T05:00:00+5:302020-11-25T05:00:33+5:30

एक तर परप्रांतीय मंजूराकडून काम करून घ्या, अन्यथा आमच्याकडून करून घ्या, असे मत हमाल व मापारी संघटनेचे संचालक बंडू वानखडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याची आमची भूमिका नाही. मात्र, स्थानिक हमालांनासुद्धा सन्मानाने जगता यावे, याकरिता न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. यामुळे बाजार समितीत तणाव निर्माण झाला होता.  याप्रकरणी बुधवारी बैठक होत आहे, अशी माहिती ठाणेदार मोहन कदम यांच्याकडून देण्यात आली आहे. 

Give us justice, otherwise stop buying commodities | आम्हाला न्याय द्या, अन्यथा शेतमाल खरेदी बंद

आम्हाला न्याय द्या, अन्यथा शेतमाल खरेदी बंद

Next
ठळक मुद्देहमालांतील वादाची धग

  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोयबीनची खरेदी ही खरेदीदारांनी बंद केली, आम्ही नाही, आम्ही कामावरच होतो. कुठलाही दोष नसताना पोलिसांनी स्थानिक दोन हमालांना अटक केली. मारहाण करणारे आमचेच कामगार आहेत का, हे आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाखवावे. आम्हाला न्याय द्या, अन्यथा काम बंद ठेवू, अशी भूमिका मंगळवारी स्थानिक हमाल व मापारी यांनी घेतली. या मुद्द्यावर अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ते एकत्र आले.
बाजार समितीत शनिवारी रात्री स्थानिक काही लोकांनी परप्रांतीय मजुरांना मारहाण केल्यानंतर वाद उफाळून आला. सोमवारी बाजार समितीत सोयाबीनचा लिलाव झाला नाही. रात्री उशिरा गाडगेनगर पोलिसांनी एक जणाला अटक केली. यानंतर मात्र स्थानिक हमाल एकत्र आले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास शेतमालाचा लिलाव सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, खरेदी दुपारी ३ नंतरच सुरू झाली. 
एक तर परप्रांतीय मंजूराकडून काम करून घ्या, अन्यथा आमच्याकडून करून घ्या, असे मत हमाल व मापारी संघटनेचे संचालक बंडू वानखडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याची आमची भूमिका नाही. मात्र, स्थानिक हमालांनासुद्धा सन्मानाने जगता यावे, याकरिता न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. यामुळे बाजार समितीत तणाव निर्माण झाला होता.  याप्रकरणी बुधवारी बैठक होत आहे, अशी माहिती ठाणेदार मोहन कदम यांच्याकडून देण्यात आली आहे. 

परप्रांतीय हमालाला मारहाणप्रकरणी स्थानिक दोन कामगार आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.
मोहन कदम 
ठाणेदार, गाडगेनगर

आम्ही काम बंद केलेच नाही. पोलिसांनी आमच्या कामगाराला अटक केली आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये तो हजर असल्याचे प्रमाण आम्हाला हवे.
- विष्णू साबळे 
अध्यक्ष कामगार संघटना

आम्हाला फुटेज दाखवावे तसेच आमच्या कामागाराविरुद्ध नोंदविलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे.
संतोष ससाने, कामगार

Web Title: Give us justice, otherwise stop buying commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.