शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

दीपाली आत्महत्येप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

अनेक दीपाली चव्हाण आपल्या आजूबाजूला सतत वावरत असतात. त्यांना कुणाची साथ मिळत नाही. वरिष्ठ सतत त्यांची मुस्कटदाबी करतात. पुरुषप्रधान व्यवस्थेने कोणताही पर्याय न ठेवल्यामुळे दीपाली चव्हाण यांची आत्महत्या नव्हे, खूनच आहे. यामुळे या प्रकरणाचा जातीने लक्ष घालण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३५४ ए, ३७६ सी  अन्वये गुन्ह्याचा समावेश करून अभियोग चालविण्यात यावा.

ठळक मुद्देमाहेर सामाजिक संस्था, आयजीकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून विनोद शिवकुमार आणि एम.एस. रेड्डी यांना निलंबित करावे आणि रेड्डींना अटक करून कठोर शासन करावे, जेणेकरून पुढे एखाद्या दीपालीसारख्या निष्पाप मुलीला जीव गमवावा लागणार नाही, अशी मागणी माहेर सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना सादर निवेदनात केली आहे. अनेक दीपाली चव्हाण आपल्या आजूबाजूला सतत वावरत असतात. त्यांना कुणाची साथ मिळत नाही. वरिष्ठ सतत त्यांची मुस्कटदाबी करतात. पुरुषप्रधान व्यवस्थेने कोणताही पर्याय न ठेवल्यामुळे दीपाली चव्हाण यांची आत्महत्या नव्हे, खूनच आहे. यामुळे या प्रकरणाचा जातीने लक्ष घालण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३५४ ए, ३७६ सी  अन्वये गुन्ह्याचा समावेश करून अभियोग चालविण्यात यावा. वरिष्ठ दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करावी. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या सर्वांविरुद्ध गुन्हे नोंदवावे. वनखात्यातील भ्रष्टाचाराची विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करावी. सदर प्रकरण जलद गती न्यायालयात  चालवावे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची यासाठी नियुक्ती करावी. कामाच्या ठिकाणी विशाखा समिती स्थापन न केल्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्याही निवेदनात नमूद आहेत. सदर निवेदन मुख्यमंत्री, वनमंत्री, गृहमंत्री व प्रधान मुख्य वनसंरक्षकांनाही देण्यात आले. याप्रसंगी अरुण सबाने यांच्यासह माहेर संस्था, मराठी कवी लेखक संघटना, सत्यशोधक महिला महासंघ, अ.भा. सत्यशोधक शिक्षकेतर महिला महासंघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, बुद्ध विहार समन्वय समिती, संबोधी बहुउद्देशीय संस्था, रमाई धम्मसृष्टी स्मारक समिती, आकांक्षा, मेळघाट लव्हर्स वन्यजीवप्रेमी ग्रुप, वूमेन्स फाऊंडेशनच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाण