शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST

हुंडा पैशात नाही, साहित्यरूपाने घेण्याची नवी ट्रिक अमरावती : समाजातील हुंडा पद्धती मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अंमलात आणलेल्या ...

हुंडा पैशात नाही, साहित्यरूपाने घेण्याची नवी ट्रिक

अमरावती : समाजातील हुंडा पद्धती मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अंमलात आणलेल्या कायद्याचे बंधन आजही लोकांनी स्वीकारलेले नाही. या कायद्याला न जुमानता हुंडा मागण्याची प्रथा देशात सुरूच आहे. तो हुंडा पैसा किंवा साहित्याच्या रूपाने मागितला जात आहे. हुंडा स्वीकारण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. हुंडा देण्यास मुलीचे वडील सक्षम नसले, तर त्यांच्या मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले जात आहे. लग्न करताना नवऱ्या मुलाला जणू मुलीचे वडील हुंडारूपाने जणू विकतच घेत आहेत.

आम्हाला हुंडा नको, असे म्हणणारी मंडळी आपल्या मुलीला दागिने करून द्या, फ्लॅट द्या, बंगला द्या, फोर व्हीलर-टू व्हीलर द्या, असे मुलीच्या वडिलांना सांगतात. पैसे किंवा साहित्याच्या रूपात हुंडा घेऊन मुलगा स्वत:ला मुलीला विकत असल्याचे चित्र समाजात पाहायला मिळत आहे.

बॉक्स

अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत...

मुलाला नोकरीसाठी लागणारे डोनेशन मुलीच्या वडिलांनी द्यावे, व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारा पैसा मुलीच्या वडिलांनी द्यावा. बहुतांश कुटुंब मौल्यवान वस्तूंच्या रूपात हुंडा घेतात.

आपला मुलगा किती होतकरू आहे, हे न पाहता गोरगरिबांपासून गर्भश्रीमंतांपर्यंत आणि अशिक्षितांपासून अगदी उच्चशिक्षितांपर्यंत हुंडा मागितला जातो. अशिक्षितांपेक्षा शिक्षित लोक जास्त हुंडा मागताना दिसतात.

हुंडा मागण्याचे स्वरूप बदलले आहे. लग्नात होणारा खर्च, डीजेचा खर्च, वरातीला लागणाऱ्या वाहनांचा खर्च, मंगल कार्यालयाचा खर्च मुलीच्याच वडिलांनी सांभाळून मुलाचे भविष्य घडविण्यातही हातभार लावाला असे सांगितले जाते.

कोट

नवी पिढी बदलतेय...

हुंडा घेणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचा आकडा मोठा आहे. मुलीचे आई-वडील मुलगा पाहताना होतकरू आणि नोकरीवाला पाहतात. परंतु, नोकरीवर लागण्यासाठी दिलेला पैसा मुलीच्या वडिलांकडून काढण्याचा अनेकांचा मानस दिसून येतो. हे आता नवीन पिढीने बदलायला हवे.

- मनीष रेचे, दहिगाव

कोट २

मुलगा नोकरीवर असेल आणि व्यसनाच्या आहारी गेला असेल, तर तो काही कामाचा नाही. मुलगा शोधताना त्याचे कर्तृत्व आणि योग्यता या दोन गाेष्टी पुढे ठेवून निर्व्यसनी मुलांनाच मुलगी देणे लोक पसंत करीत आहेत. आता नोकरीही त्यांच्यासमोर दुय्यम झाली आहे.

- सुधीर तायडे, पालक

-००००

बॉक्स

हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?

हुंडा म्हणून सरळ पैसे न घेता गाडी, बंगला, फ्लॅट, प्लॉट, मौल्यवान दागिने मागितले जातात.

लग्नात होणारे अवडंबर, मुलाला लग्नात लागणारा खर्चही मुलींच्याच वडिलांकडून घेतला जातो.

लग्नात कन्यादानात झालेल्या मुलीच्या पैशांवरही सासरच्या मंडळींची नजर असते.

बॉक्स

मुलीचे आई-वडीलही जबाबदार

हुंडा मागणारा मुलगा आपल्या मुलीवर प्रेम कसे करेल, त्याला तिच्यावर नाही, तर पैशावर प्रेम आहे, असे मुलीच्या आई-वडिलांनी समजले पाहिजे. हुंडा मागणाऱ्या मुलाला व त्याच्या कुटुंबीयांना तुरुंगाची हवा दाखविणे गरजेचे आहे.

बॉक्स

हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी

२०१८

२०१९

२०२० : ६२४

२०२१ : २८२