शेती मालाला भाव द्या शेती कर्जमुक्त करा
By Admin | Updated: June 5, 2017 00:10 IST2017-06-05T00:10:03+5:302017-06-05T00:10:03+5:30
वस्तूचे वाटप वाढत असताना शेतीमालाचे भाव पडले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर आला असून शेती कशी पेरावी,...

शेती मालाला भाव द्या शेती कर्जमुक्त करा
वीरेंद्र जगताप : शेतकरी आर्थिक अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : वस्तूचे वाटप वाढत असताना शेतीमालाचे भाव पडले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर आला असून शेती कशी पेरावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शेतमालाला योग्य भाव व शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, असे प्रतिपादन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले.
ते नांदगाव खंडेश्वर येथे नगर पंचायतच्यावतीने मुख्य रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, नगराध्यक्ष अक्षय पारसकर, देवीदास सुने, सुखदेवराव शिरभाते, बापुरावजी सोनोने, जमीलभाई, खंडेश्वर संस्थानचे अध्यक्ष प्रकाश जाधव हे मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. आभार प्रदर्शन कल्पनाताई मारोटकर यांनी केले. या रस्त्यासाठी केलेल्या प्रयत्नाची सविस्तर माहिती आ. जगताप यांनी आपल्या भाषणातून दिली.