मुलींनो, सोशल मीडियापासून दूर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:05 IST2017-08-12T23:04:54+5:302017-08-12T23:05:32+5:30

इंटरनेटचा वापर वाढत असल्याने छेडछाडीच्या पद्धतीत बदल झाला आहे.

Girls, stay away from social media | मुलींनो, सोशल मीडियापासून दूर राहा

मुलींनो, सोशल मीडियापासून दूर राहा

ठळक मुद्देपोलिसांचे मार्गदर्शन : फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपचा वापर जपून करा

लोकमत न्यूज नेटवर्क
कुºहा : इंटरनेटचा वापर वाढत असल्याने छेडछाडीच्या पद्धतीत बदल झाला आहे. सायबर क्राईमच्या प्रकारापासून आपले संरक्षण कसे कारावे, याबद्दलची माहिती स्थानिक कुºहा हायस्कूलच्या विद्यार्थिनींना देण्यात आली.
स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी कुºहा हायस्कूलच्या विद्यार्थिनींना सायबर क्राईम, सोशल मीडिया, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक व इंटरनेटच्या होत असलेल्या चुकीच्या वापराबद्दल माहिती दिली. महिला सुरक्षेबद्दल रक्षण कसे करावे, अपरिचित प्रकार, मुलींच्या छेडखानीचे प्रकार कोठे होत असेल तर आपले शिक्षक, शिक्षिका, किंवा पोलिसांसोबत संपर्क साधावा. यामुळे काही घडणाºया प्रकाराला थांबवून मुलींचे संरक्षण होईल, अशी माहिती येथील अधिकाºयांनी दिली. यावेळी पोलिसांना राखी बांधून समाजाचे रक्षण करण्याचे साकडे घालण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी राऊत, उपविभागात येणारे सर्व ठाणेदार, पीएसआय पाटील, इतर पोलीस कर्मचारी, शिक्षक कडू सर, प्रफुल राऊत, बिजवे सर, चाबटकर मॅडम, बेहरे मॅडम, राऊत मॅडम, इतर शिक्षक प्रमुख मंडळी उपस्थित होती.

Web Title: Girls, stay away from social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.