एसटी बसमध्ये मुलीची पर्स लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST2021-09-13T04:11:57+5:302021-09-13T04:11:57+5:30
भावानेच दंडावर चाकू मारला चांदूर बाजार : भाड्याच्या घरात न राहण्यावरून दोन भावंडात वाद झाला. वाद विकोपाला जाताच शिवीगाळ ...

एसटी बसमध्ये मुलीची पर्स लांबविली
भावानेच दंडावर चाकू मारला
चांदूर बाजार : भाड्याच्या घरात न राहण्यावरून दोन भावंडात वाद झाला. वाद विकोपाला जाताच शिवीगाळ करून भावानेच भावाच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकू मारून जखमी केले. ही घटना स्थानिक शिवाजीनगरात ९ सप्टेंबर रोजी घडली. भावेश गायकवाड (३९) याच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी मनीष अरू गायकवाड (३८, रा. पिंपळपुरा, ह.मु. शिवाजीनगर चांदूर बाजार) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------
तक्रार दिल्यावरून इसमाला मारहाण
चिखलदरा : पोलिसात तक्रार दिल्याचा वचपा काढण्याच्या उद्देशाने रस्त्यात दुचाकी थांबवून संगणमताने इसमाला काठीने व चाकूने मारून जखमी करण्यात आले. ही घटना कुलंगना शिवारात रात्री सकाळी ११ वाजता दरम्यान घडली. रामभाऊ गणपत खडके (४५, रा. कुलंगना) यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी आरोपी तानू मनुजी खडके, दादू खडके, बलदेव खडके, नागो खडके (सर्व रा. कुलंगना) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
डोक्यावर लाकडी झिल्पी मारली
चिखलदरा : बहिणीच्या भरोशावर मजा करीत असल्याच्या सांगताच शिवीगाळ करून लाकडी झिल्पीने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना सेमाडोह येथे ७ सप्टेंबर रोजी घडली. राजेश बालकराम सावलकर (२९) याच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी अशोक बालकराव सावलकर (३३, रा. सेमाडोह) विरुद्ध १० सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदविला.