प्लॅटफाॅर्म तिकिटांचे १० रुपये घ्या, रेल्वेमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:00+5:302021-03-13T05:00:57+5:30
‘लाेकमत’ने ११ मार्च रोजी ‘प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी आजपासून मोजावे लागतील ५० रुपये’ या आशयाचे वृत्त रेल्वे अधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना प्लॅटफाॅर्म तिकिटांसाठी १० रुपये शुल्क आकारावे आणि तसे आदेश विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावे, अशी मागणी केली आहे.

प्लॅटफाॅर्म तिकिटांचे १० रुपये घ्या, रेल्वेमंत्र्यांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी नातेवाईक, आप्तस्वकीयांची होणारी गर्दी रोखण्यासाठी कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकीट प्रत्येकी ५० रुपये केले. मात्र, ही बाब प्रवाशांवर अन्याय करणारी असून, प्लॅटफाॅर्म तिकीट पूर्वीप्रमाणे १० रुपयेच दर आकारावे, अशी मागणी पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
‘लाेकमत’ने ११ मार्च रोजी ‘प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी आजपासून मोजावे लागतील ५० रुपये’ या आशयाचे वृत्त रेल्वे अधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना प्लॅटफाॅर्म तिकिटांसाठी १० रुपये शुल्क आकारावे आणि तसे आदेश विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावे, अशी मागणी केली आहे.
भुसावळ, नागपूर रेल्वे विभागांतर्गत प्रमुख रेल्वे स्थानकांवर ११ मार्चपासून प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उपाययोजना जरूर कराव्या, मात्र प्लॅटफाॅर्म तिकीट दर ५० रुपये करून गर्दी कमी होणार नाही, असे खासदार यांनी पत्रात नमूद केले. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावरही प्लॅटफाॅर्म तिकिटांसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. त्याऐवजी १० रुपये शुल्क घ्यावे, अशी मागणी खासदार राणा यांनी केली आहे.