रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिटांना जूनपर्यंत तूर्त ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST2022-03-04T05:00:00+5:302022-03-04T05:00:58+5:30

कोरोना महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर श्रमिक ट्रेन सुरू करून परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविले. ११ नोव्हेंबरपासून जनरल तिकीट सुरू करण्यात आले. मेमू ट्रेनमध्ये जनरल तिकिटांची सुविधा आहे.  हाॅलिडे आणि स्पेशल ट्रेन वगळता अन्य रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे; परंतु यापूर्वीच्या नियमावलीनुसार १२० दिवसांपर्यंत रेल्वे गाड्यांचे आरक्षण दिले आहे.

General tickets for trains will be 'no' till June. | रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिटांना जूनपर्यंत तूर्त ‘ना’

रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिटांना जूनपर्यंत तूर्त ‘ना’

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे प्रशासनाने हॉलिडे आणि स्पेशल ट्रेन वगळता अन्य गाड्यांमध्ये जनरल तिकीट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १२० दिवसांपर्यंतचे आरक्षण दिले आहे. त्यामुळे आता १ जुलै २०२२ पासून रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट नियमावली लागू होईल, अशी माहिती आहे.
कोरोना महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर श्रमिक ट्रेन सुरू करून परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविले. ११ नोव्हेंबरपासून जनरल तिकीट सुरू करण्यात आले. मेमू ट्रेनमध्ये जनरल तिकिटांची सुविधा आहे.  हाॅलिडे आणि स्पेशल ट्रेन वगळता अन्य रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे; परंतु यापूर्वीच्या नियमावलीनुसार १२० दिवसांपर्यंत रेल्वे गाड्यांचे आरक्षण दिले आहे. यामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही रेल्वे गाड्यात नव्या नियमानुसार जनरल तिकीट देता येणार नाही, हे वास्तव आहे.

जनरल तिकीट

या रेल्वेत मिळणार जनरल तिकीट
मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नागपूर व भुसावळ विभागाअंतर्गत एकमात्र मेमू ट्रेनमध्ये हल्ली जनरल तिकीट मिळण्याची सुविधा आहे. अमरावती ते भुसावळ आणि अमरावती ते वर्धा या दरम्यान मेमू ट्रेन धावत आहे. अन्य गाडीत जनरल तिकीट मिळणार नाही.

या रेल्वे गाड्यात मिळणार नाही जनरल तिकीट
अमरावती- मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल एक्स्प्रेस, गीतांजली, अहमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्सप्रेस आदी गाड्यांमधून प्रवासासाठी जनरल तिकीट मिळणार नाही. 

प्रवासी म्हणतात

अप-डाऊन करताना जनरल तिकीट हे सोयीचे ठरते. मात्र, रेल्वेची नवीन नियमावली काही काळ प्रतीक्षेत असणार आहे. कोरोनानंतर रेल्वेच्या वाढीव भाड्यांमुळे दिलासा मिळेल, असे चित्र होते. 
-विनाेद गजभिये, प्रवासी.

कोरोनाकाळात आरक्षण तिकीट घेऊनच रेल्वेत प्रवास करावा लागला. तथापि, अगाेदरच्या नियमांनुसार १२० दिवसांपर्यत आरक्षण देण्यात आल्याने जनरल तिकिटांसाठी प्रतीक्षा करावी लागेल.
- प्रगती बांबोडे, अमरावती.

सर्वसामान्य प्रवाशांना फटका कायम
कोरोना महामारीने २२ मार्च २०२० पासून रेल्वेत जनरल तिकीट बंद करण्यात आले होते. विशेष ट्रेन, हॉलिडे स्पेशल या नावाने सुरू असलेल्या रेल्वेमधून प्रवास करताना अतिरिक्त भाडे द्यावे लागते. आता कसेतरी रेल्वेत जनरल तिकीट मिळणार असताना १२० दिवसांच्या आरक्षणामुळे ३० जूनपर्यंत २०२२ पुन्हा जनरल तिकिटांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना फटका कायम आहे.

रेल्वेच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाते. हॉलीडे, स्पेशल ट्रेन वगळता अन्य गाड्यांमध्ये जनरल तिकीट देण्याची नियमावली लागू झाली असली तरी अगोदर १२० दिवसांचे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ३० जूननंतरच रेल्वेत जनरल तिकीट देण्याची कार्यवाही केली जाईल.
- महेंद्र लोहकरे, प्रबंधक, अमरावती रेल्वे स्थानक

 

Web Title: General tickets for trains will be 'no' till June.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे