एमआयडीसीमध्ये सामान्य सुविधा केंद्र सुरू करणार

By Admin | Updated: October 22, 2015 00:12 IST2015-10-22T00:12:10+5:302015-10-22T00:12:10+5:30

देशाच्या औद्योगिक विकासाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना अंमलात आणली आहे.

General facilitation center in MIDC | एमआयडीसीमध्ये सामान्य सुविधा केंद्र सुरू करणार

एमआयडीसीमध्ये सामान्य सुविधा केंद्र सुरू करणार

पालकमंत्री : परवाना प्रक्रिया सुलभीकरण कार्यशाळा
अमरावती : देशाच्या औद्योगिक विकासाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना अंमलात आणली आहे. या अनुषंगाने उद्योजकांना उद्योग उभारणीसंदर्भात आवश्यक परवाने, मंजुरी व नाहरकत प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध व्हावेत, यासाठी एमआयडीसीत सामान्य सुविधा केंद्र सुरू करणार असल्याचे राज्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितले.
सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत उद्योगाकरिता आवश्यक परवाने, मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेची सुलभीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अपर जिल्हाधिकारी के.आर.परदेशी, उद्योग सहसंचालक ए. पी. धर्माधिकारी, जिल्हा उद्योगकेंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष, सचिव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, उद्योजक हा देशाच्या व राज्याच्या विकासाकरिता अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अमरावती विभाग हा उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी उद्योजकांनी मेहनतीने काम करावे. उद्योगासंदर्भात कुठल्याही परवानग्या, नाहरकत प्रमाणपत्रासाठी शासनातर्फे अडचण येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अमरावती शहरात उद्योगवाढीसाठी उद्योजकांनी युवकांना तसेच आयटीआय विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करावे. शहरातील काही युवकांना राज्य शासनाव्दारे भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. व आॅर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, नागपूर येथे प्रशिक्षित करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिली. मुद्रा बँकेच्या माध्यमातून पाच हजार उद्योजकांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी गित्ते यांनी सांगितले.
कार्यक्रमात ‘मेक इन महाराष्ट्र’ अतंर्गत ‘मेक इन महाराष्ट्र’ व ‘इज आॅफ डुर्इंग बिजनेस’ या विषयावर उद्योग सहसंचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी माहिती दिली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महाव्यवस्थापक उदय गिरी यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: General facilitation center in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.