शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गो.सी. टोम्पे महाविद्यालयात जैविक शेतीविषयक कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

चांदूर बाजार : स्थानिक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पाणी व माती परीक्षण प्रयोगशाळा, वनस्पतिशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र ...

चांदूर बाजार : स्थानिक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पाणी व माती परीक्षण प्रयोगशाळा, वनस्पतिशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक शेती जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भास्कर टोम्पे होते. प्रमुख वक्ते म्हणून पंजाब येथील कृषितज्ज्ञ जी.एस. गिल, प्राचार्य राजेंद्र रामटेके, कृषी अधिकारी अरुण गजभिये, अभ्युदय सोमवंशी, आशिष नवले, दिलीप विघाते प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते गिल म्हणाले, रासायनिक शेतीमुळे उत्पन्नात वाढ होत असली तरी मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय शेती केल्यास उत्पन्न वाढेल व आरोग्यही सुरक्षित राहील. बैल, गाय, म्हैस यांच्या मलमूत्रामध्ये गुळ व बेसन योग्य प्रमाणात मिक्स करून पिकांना ड्रीपवाटे दिल्यास पिकावर कोणतेही रोग येणार नाहीत. अशा विविध जैविक पद्धतीचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी कृषी अधिकारी अरुण गजभिये, राजाभाऊ देशमुख, दिलीप विधाते, भास्कर टोम्पे

यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी मंगेश अडगोकर यांनी केले. आभार प्रवीण परिमल यांनी मानले. यावेळी प्र-प्राचार्य देवतळे, प्राचार्य संजय शेजव, राजाभाऊ देशमुख, ठाकरे यांच्यासह शेतकरी, प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रशांत सातपुते, ज्ञानेस्वर वारंगे, जयंत बन्सोड, निधी दीक्षित, युगंधरा गुल्हाने, प्रिया देवळे, मंजूषा पवार, प्रफुल्ल चौधरी, सहकार्यक्रम अधिकारी उमेश कनेरकर, अतुल सरोदे, धनंजय बिजवे, सचिन भोम्बे, दुमटकर, रविकांत कोल्हे, प्रणित देशमुख, रोशन सावरकर, नितीन सातपुते, देशमुख, पवार यांनी परिश्रम घेतले.