शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

गॅस सबसिडी बंद झालेली नाही, पण पदरातही पडत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 5:00 AM

लोकामंध्ये जनजागृतीसह उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गरिबांना गॅस कनेक्शनही देण्यात आले. मात्र, गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी पडू लागल्याने किंवा अन्य कारणांनी दर महिन्यात सिलिंडरची किंमत वाढत गेल्याने तसेच शासनाकडून मिळणारी सबसिडी केवळ १६.१९ रुपयेच मिळत असल्याने सर्वसामान्य मजुरदार वर्गाला सिलिंडर घेणे अशक्य होऊ लागले आहे.

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घरगुती गॅसवरील सबसिडी शासनाने बंद केली नसली तरी ग्राहकांच्या पदरात ती पडत नाही. त्यामुळे केवळ नावालाच सबसिडी दिली जात असल्याने गॅस सिलिंडरच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.लोकामंध्ये जनजागृतीसह उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गरिबांना गॅस कनेक्शनही देण्यात आले. मात्र, गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी पडू लागल्याने किंवा अन्य कारणांनी दर महिन्यात सिलिंडरची किंमत वाढत गेल्याने तसेच शासनाकडून मिळणारी सबसिडी केवळ १६.१९ रुपयेच मिळत असल्याने सर्वसामान्य मजुरदार वर्गाला सिलिंडर घेणे अशक्य होऊ लागले आहे.

ही तर फसवेगिरी

पूर्वी गॅस सिलिंडरची सबसिडी शासनामार्फत थेट गॅस कंपनीला दिली जात होती. तेव्हा चारशे रुपयांच्या आत सिलिंडर मिळत होते. नंतर अपहार टाळण्याच्या नावावर शासनाने थेट ग्राहकांच्या खात्यात सबसिडीची रक्कम टाकली. मात्र, ती कालांतराने नसल्यासारखीच मिळू लागली. ही जनतेची फसवेगिरीच नव्हे काय?- प्रतिभा मानकर गृहिणी

ग्रामीण भागात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत कनेक्शन दिले. मात्र, आता सिलिंडर हजाराच्या घरात जात असून त्यावर सबसिडी नसल्यासारखीतच असल्याने शासनाने केवळ चूल बंद करून गॅसची सवय लावून गोरगरिबाची फसगत केल्याचे दिसून येत आहे. महागाई वेगाने वाढत आहे. अशावेळी दोन वेळच्या जेवणाची सोय लावावी कशी, हा प्रश्न आहे. - सावित्रीबाई जाधव,  गृहिणी

पूर्वी सिलिंडर आणल्यानंतर सबसिडीची रक्कम खात्यात जमा होण्याची वाट पाहत होतो. आता शासनाने सबसिडी बंद केलेली नाही. परंतु, सबसिडीची रक्कम अत्यंत तोकडी दिली जात असल्याने ती जमी होते की नाही, याकडे लक्षच राहत नाही. त्यामुळे मोठी फसवणूक झाल्याचे दिसते. सिलिंडरचे दरही वाढले आहेत. - जयश्री राठोड,  गृहिणी

सिलिंडर हजारात अन् सबसिडी १६ रुपये

शासनाने सबसिडी सुरूच ठेवली आहे. मात्र, किंमत ९५६ आणि सबसिडी १६ रुपये आता तर त्याहीपेक्षा कमी मिळत असल्यामुळे ही मदत कोणत्याच कामात येत नाही. शासनाने एकतर सबसिडीची रक्कम वाढवावी, नाही तर गॅसवरील अधिभार कमी करावा, जेणेकरून सिलिंडरची किंमत कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर