शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस ग्राहकांची ‘गुपचूप’ लूट

By admin | Updated: October 27, 2015 00:10 IST

शहर तथा जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अधिक एलपीजी गॅस ग्राहकांची ‘गुपचूप’ लूट सुरू आहे.

महिन्याला ५० लाखांची वसुली : सिलिंडर मोजून देण्यास नकारलोकमत विशेषप्रदीप भाकरे अमरावतीअमरावती : शहर तथा जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अधिक एलपीजी गॅस ग्राहकांची ‘गुपचूप’ लूट सुरू आहे. ‘डिलिव्हरी चार्जेस’च्या नावावर लाखो ग्राहकांकडून ‘डिलिव्हरी मॅन’ ‘डिलिव्हरी चार्ज’च्या नावाखाली प्रत्येकी १० ते २० रुपये उकळत आहे. महिन्याकाठी ही रक्कम ५० लाखांच्या घरात जाते.जिल्ह्यात हिंदूस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल कार्पोरेशनकडून एलपीजी (घरगुती) गॅसचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक वितरक आहेत. वितरकांकडे गॅसची मागणी केल्यानंतर उपलब्धतेनुसार ग्राहकांना एजन्सीने नेमलेल्या ‘डिलिव्हरी मॅन’मार्फत घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविले जाते. उल्लेखनीय म्हणजे वितरकांकडून दिल्या जाणाऱ्या एकूण रकमेच्या पावतीमध्ये ‘डिलिव्हरी चार्ज’चा अंतर्भाव असतो. पावतीवर असलेली रक्कम घेऊन गॅस सिलिंडर देणे बंधनकारक असताना प्रत्येक ग्राहकाकडून अतिरिक्त १० ते २० रुपये उकळले जातात. महिन्याकाठी ४ लाख ग्राहकांकडून १० ते १२ रूपये याप्रमाणे हिशेब केल्यास सरासरी ही रक्कम ५० लाखांवर जाते. सिलिंडरमध्ये गॅस कमीघरी येणारे गॅस सिलिंडर वजन करून घेतल्यानंतरच स्वीकारा. अन्यथा त्यात दोन ते तीन किलो गॅस कमी राहू शकतो. राहुलनगर, बिच्छू टेकडी येथील ग्राहकांची अशी फसवणूक झाली होती. उल्लेखनीय म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी हेमंत पवार यांच्या कार्यकाळात पुरवठा विभागाने नवाथे परिसरात सिलिंडरचे ‘रि-रिफिलींग’ करणाऱ्या टोळीचा गोरखधंदा उघड केला होता. पुन्हा त्या गोरखधंद्याने उचल खाल्ली आहे.का होते लुबाडणूक?दर महिन्याला ‘डिलिव्हरी बॉय’कडून १० ते २० रुपये अतिरिक्त घेतले जातात. मज्जाव केल्यास घरपोच सेवा बंद होण्याची भीती ग्राहकांना वाटते. ‘डिलिव्हरी बॉय’कडे वजन काटा असतो हे अनेकांना माहिती नाही. बडनेऱ्यात तर अनेकदा यावरून वादसुध्दा उद्भवले आहेत. अशी होते गॅसची चोरी...ग्राहकांपर्यंत प्रत्यक्षात गॅस सिलिंडर पोहोचण्यापूर्वी सिलिंडरचे सील पूर्ण न तोडता टाचणी किंवा बारीक सुईच्या साहाय्याने त्याचे पॅकिंग सैल केले जाते. त्यानंतर ते झाकणासह बाहेर काढले जाते. त्यातील गॅस दुसऱ्या रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जातो. अशारितीने गैरप्रकार झाल्यानंतर ग्राहकांपर्यंत हे सिलिंडर पोहचते तेव्हा त्यात अडीच ते तीन किलो गॅस कमी झालेला असतो. गॅस १४ किलो २०० ग्रॅमभरलेल्या घरगुती सिलिंडरचे वजन साधारणत: ३१ किलो २०० ग्रॅम असते. त्यात १४ किलो २०० ग्रॅम इतका गॅस असतो. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सिलिंडर घेताना वजन करुन घेणे आवश्यक आहे. रिकाम्या गॅस सिलिंडरचे वजन कमी अधिक होऊ शकते.