'प्रेस' च्या नावाआड कारमधून बिनबोभाट व्हायची गांजा तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:07 IST2025-04-05T14:05:54+5:302025-04-05T14:07:38+5:30
दोन पुरुष, तीन महिलांना अटक : ४० किलो गांजासह १३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Ganja smuggling in a car in the name of 'press' goes undetected
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चक्क 'प्रेस' असे लिहिलेल्या कारमधून होत असलेल्या गांजा तस्करीचा गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने पर्दाफाश केला. त्या कारसह ४०.३५ किलो गांजा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १३.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, घटनास्थळाहून दोन पुरुष व तीन महिलांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखाप्रमुख पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या पथकाने ४ एप्रिल रोजी नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी रोडवर ही कारवाई केली.
एमएच-४८-ए.-४९०० या कारसह सय्यद राशीद सय्यद जमशीद (वय ३५), अरफाक दानिश शब्बीर पटेल (२३, दोन्ही रा. इस्लामी चौक, जुनी वस्ती, बडनेरा) व वडरपुरा येथील रहिवासी असलेल्या तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले.