शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

महामार्गावरून थ्रो; गांजाचे बॉल थेट अमरावती कारागृहात, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2022 16:52 IST

पोलिसांना पत्र, अमली पदार्थांसाठी कैद्यांद्वारे आगळीवेगळी शक्कल

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात मागील बाजूस गेलेल्या नवीन हायवेवरून गांजा, चरस, अफीम आदी अमली पदार्थ बॉलद्वारे फेकले जात असून, याबाबत फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे नागपूर-औरंगाबाद नवीन राष्ट्रीय महामार्गाचा रिंग रोड कारागृहासाठी धोकादायक ठरू लागला आहे.

मध्यवर्ती कारागृह हे अमरावती शहराच्या मध्यवस्तीत आले आहे. कारागृहाच्या मागील बाजूस नवीन रिंग रोड, तर अन्य तिन्ही बाजूने लोकवस्तीचा परिसर आहे. परिणामी कारागृहाच्या पाषाण भिंतीपल्याड चौफेर सुरक्षा यंत्रणा हाताळणे मनुष्यबळाअभावी कारागृह प्रशासनाला शक्य होत नाही. यंदा जून महिन्यात झालेल्या ‘जेल ब्रेक’नंतर तीन कैद्यांनी पलायन केले होते. त्यानंतर मध्यवर्ती कारागृहाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था चोखपणे बजावली जात आहे. मात्र, काही नशेखोर कैद्यांनी आता गांजा, चरस, अफीम वा गुटखा असे पदार्थ कारागृहात मागविण्यासाठी नवीन हायवेवरून बॉलचा वापर करीत आहेत. रात्री-अपरात्री महामार्गावरून थ्रो बॉल करून कारागृहात अमली पदार्थ आणण्याची शक्कल लढविली जात असल्याची माहिती आहे. गांजाचे थ्रो बॉल संबंधित कैद्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरक्षा कर्मचारी अथवा पहारेकरी कैदी सहभागी असल्याचे दिसून येते.

कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत उणिवा

येथील मध्यवर्ती कारागृहात गत सहा महिन्यांपूर्वी ‘जेल ब्रेक’ची घटना घडली होती. यात काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईदेखील झाली. मात्र, तरीही कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत पाहिजे तशी सुधारणा झाली नाही, असे चित्र आहे. गत काही दिवसांपासून कारागृहात थ्रो बॉलद्वारे अमली पदार्थ येत असतील तर याला जबाबदार कोण, याचा कारागृह प्रशासनाने शोध लावणे गरजेचे होते. मात्र पाेलिसात तक्रार करून नामानिराळे होण्याचा हा प्रकार ठरत आहे.

कारागृहाची तटभिंत हायवेवरून हाकेच्या अंतरावर

नवीन हायवेवरून कारागृहाच्या आतील भाग सहजतेने बघता येतो, असा हायवे मार्ग उंचावर आहे. नेमकी हीच बाब हेरून नशेखोर कैद्यांच्या समर्थकांनी थ्रो बॉलद्वारे गांजा, चरस, अफीम कारागृहात पोहोचविण्याची शक्कल लढविली आहे. यात ते यशस्वी देखील होत आहे. तटभिंतीवरून काही वस्तू, साहित्य कारागृहात सहजतेने फेकता येईल, असे हायवेचे अंतर आहे. कारागृहात भाईगिरी करणारे काही कैदी गांजाचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे.

विदेशी, नक्षलवादी, खुनाच्या आरोपातील कैदी

येथील मध्यवर्ती कारागृहात हल्ली १५०० पेक्षा जास्त कैदी बंदिस्त आहेत. यात जन्मठेप, सश्रम कारावास, मकोका, एमपीडीए, नक्षलवादी, एनपीपीएस, विदेशी, रात्र पहारेकरी, लालपट्टी, सिद्धदोष अन्वेक्षक कैद्यांचा समावेश आहे. महिला, पुरुष कैदी बंदिस्त आहेत.

कारागृहात तटभिंतीच्या बाहेरून बॉल फेकल्या जात असल्याची तक्रार मी रुजू झाल्यापासून नाही. पण याअगोदर दिली असेल तर याची खात्री करून घेईल. कारागृहाच्या तटभिंतीची उंची, बाह्य सुरक्षासंदर्भात विशेष शाखेकडून ऑडिट केले जाते. आता कारागृह तटभिंतीच्या बाहेरील भाग किंवा नवीन हायवेवर पोलिसांची गस्त वाढविली जाईल.

- गोरखनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगPrisonतुरुंगDrugsअमली पदार्थAmravatiअमरावती