महिला चोरांची टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:56 AM2018-12-13T00:56:22+5:302018-12-13T00:57:04+5:30

आॅटो, बसप्रवासादरम्यान महिलांजवळील रोख वा दागिने लंपास करणारी महिलांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. मंगळवारी फे्रजरपुरा हद्दीत आॅटो प्रवासी महिलेच्या पर्समधून ५६ हजार ४०० रुपयांची रोख लंपास झाली, तसेच राजापेठ हद्दीत बसप्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ९१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

The gang of women thieves active | महिला चोरांची टोळी सक्रिय

महिला चोरांची टोळी सक्रिय

Next
ठळक मुद्देएकाच दिवशी दोन घटना : दोन महिलांकडील रोख, दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आॅटो, बसप्रवासादरम्यान महिलांजवळील रोख वा दागिने लंपास करणारी महिलांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. मंगळवारी फे्रजरपुरा हद्दीत आॅटो प्रवासी महिलेच्या पर्समधून ५६ हजार ४०० रुपयांची रोख लंपास झाली, तसेच राजापेठ हद्दीत बसप्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ९१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यामुळे आॅटो व बसचा प्रवास करताना महिलांनी सावधगिरी बाळगणे अनिवार्य झाले आहे.
शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वर्षभरात २० ते २५ गुन्ह्यांत महिलाचोरांचा सहभाग वाढल्याचे आढळून आले आहे. अमरावती शहरातील सर्वसाधारण व मध्यवर्गीय अनेक महिला आॅटो व बसने प्रवास करीत आपआपल्या कामात मग्न असतात. बेसावधपणे प्रवास करणाऱ्या या महिलांजवळील रोख व दागिन्यावर महिलाचोरांनी आता लक्ष वेधले आहे. आॅटो किंवा बसमध्ये महिला चोर महिला प्रवाशाजवळ बसून प्रवासी असल्याचे दाखवितात.दरम्यान दुसरीकडे आपले लक्ष वेधून बेसावध असताना हातसफाई करून पर्समधील रोख व दागिने चोरतात. प्रवासी आॅटोतून खाली उतरल्यानंतर त्यांना रोख व दागिने लंपास झाल्याचे माहिती पडत आहे. अशाप्रकारच्या अनेक घटना शहरात घडल्या असून, या घटनांवरून शहरात महिला चोर सक्रिय झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या महिला चोरांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.


पर्समधून चोरून नेली छोटी पर्स
आपल्या पतीसोबत अकोल्यावरून अमरावतीत आलेली महिला नवाथेनगर चौकात मंगळवारी दुपारी बसमधून उतरली. तेथून ते दाम्पत्य नातेवाईकांच्या घरी गेले. त्यावेळी खांद्यावरील पर्समधील छोटी पर्स चोरी गेल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने व १० हजारांची रोख असा ९१ हजारांचा मुद्देमाल महिला चोरांनी चोरून नेला आहे. या घटनेची तक्रार राजापेठ पोलिसांत नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

आॅटो प्रवासी महिलेचे ३३ हजार ५०० रुपये लंपास
फे्रजरपुरा हद्दीतील एका महिलेने भारतीय स्टेट बँकेतून ९० हजारांची रोख काढली. त्यानंतर ती महिला राजेंद्र कॉलनीतील बहुउद्देशीय नागरिक सहकारी पतसंस्था येथे कर्जाची रक्कम ५६ हजार ४०० रुपये भरण्यासाठी गेली. त्यानंतर उर्वरित रक्कम ३३ हजार ५०० रुपये महिलेने जवळील पर्समध्ये ठेवले. तेथून ती महिला राजेंद्र कॉलनीतून मैत्रिणीसोबत आॅटोने मोतीनगरपर्यंत आली. दरम्यान, आॅटोमधील अज्ञात महिला प्रवाशाने पर्समधून ३३ हजार ५०० रुपयांची रोख उडविली. या घटनेची तक्रार महिलेने फ्रेजरपुरा पोलिसात केली आहे.

नागरिकांनी स्वत:च घ्यावी काळजी, पोलिसांचे आवाहन
नवीन ठिकाणी प्रवास करताना नागरिकांनी प्रवासात आपली पर्स व बॅग सांभाळून ठेवावी, पैशांसह दागिन्याची स्वत:च काळजी घ्यावी, तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल, असे आवाहन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी केले. पोलीस आपल्या परीने तपास करून आरोपीचा निश्चितच शोध घेईल, असेही सातव म्हणाले.

Web Title: The gang of women thieves active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर